इंग्लंड जिंकली... ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर
सिडनी, 05 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये खेळणाऱ्या चार पैकी दोन टीम कोण हे स्पष्ट झालं आहे. या दोन्ही टीम सुपर 12 फेरीच्या ग्रुप 1 मधील आहे. आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंड आणि श्रीलंका संघात निर्णायक सामना झाला. या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेला हरवून सेमी फायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलं. त्याआधी न्यूझीलंडनं ग्रुप 1 मध्ये पाचपैकी 3 मॅच जिंकून सरस नेट रन रेटच्या आधारे आपलं स्थान आधीच निश्चित केलं होतं. त्यामुळे न्यूझीलंड आणि इंग्लंड आता ग्रुप 2 मधील दोन टीमशी सेमी फायनलमध्ये भिडणार आहेत.
इंग्लंडकडून श्रीलंकेचा धुव्वा आशिया कप जिंकून ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या श्रीलंकेनं टी20 वर्ल्ड कपमध्ये मात्र निराशा केली. स्पर्धेच्या सलामीलाच नामिबियानं श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला होता. पण तरीही कशीबशी सुपर 12 फेरीत धडक मारण्यात श्रीलंका यशस्वी ठरली. पण सुपर 12 मध्ये 5 पैकी केवळ दोन सामने श्रीलंकेला जिंकता आले. सिडनीत झालेल्या आजच्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेनं अवघ्या 141 धावाच स्कोअर बोर्डवर लावल्या. पथुन निसंका (67) चा अपवाद वगळता एकाही श्रीलंकन फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे 142 धावांचं सोपं आव्हान इंग्लंडनं 4 विकेटच्या मोबदल्यात पार केलं. बेन स्टोक्स (ना. 44) आणि अॅलेक्स हेल्सनं (47) महत्वपूर्ण खेळी करुन इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयासह गेल्या तीन टी20 वर्ल्ड कपमध्ये सलग तिसऱ्यांदा इंग्लंडनं सेमी फायनल गाठण्याची कमाल केली आहे.
ऑस्ट्रेलिया आऊट, इंग्लंड इन इंग्लंडनं या विजयासह फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. न्यूझीलंडन सरस नेट रन रेटच्या आधारे ग्रुप 1 मध्ये आधीच आपलं स्थान पक्क केलं होतं. पण त्यानंतर दुसऱ्या स्थानासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये चुरस होती. ऑस्ट्रेलियानं आपल्या शेवटच्या मॅचमध्ये अफगाणिस्तानला हरवून सेमी फायनलच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण इंग्लंडनं श्रीलंकेला हरवल्यानं नेट रन रेटच्या आधारे ते सेमी फायनलसाठी पात्र ठरले. त्यामुळे यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. हेही वाचा - Virat Kohli: भारतीय ड्रेसिंग रुममधल्या ‘या’ खास व्यक्तीसोबत विराटनं कापला केक, पण हे आहेत तरी कोण? टीम इंडियाचा सामना कुणाशी? दरम्यान ग्रुप 2 मधून कोणत्या दोन टीम सेमी फायनलमध्ये येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण रविवारी ग्रुप 2 मधले उर्वरित सामने होणार आहेत. ग्रुप 2 मध्ये सध्या टीम इंडिया 6 पॉईंटसह अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. भारताचा सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. तर दक्षिण आफ्रिका नेदरलँडविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे शेवटचा सामना जिंकून टीम इंडिया ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थानावर राहील असा अंदाज आहे. त्यानंतर सेमी फायनलमध्ये ग्रुप 1 मध्ये दुसऱ्या नंबरवर असलेल्या इंग्लंडशी टीम इंडियाचा सामना होण्याची शक्यता आहे. हा सामना