अमित मिश्रा
मुंबई, 27 ऑक्टोबर: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अमित मिश्राच्या एका ट्विटमुळे तो पाकिस्तानी फॅन्सच्या रडारवर आला आहे. अमित मिश्राच्या या ट्विटरवर पाकिस्तानातील काही नेटिझन्सनी जोरदार प्रतिक्रिया दिली आणि त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गुरुवारी टी20 वर्ल्ड कप मध्ये झिम्बाब्वेकडून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर पाकिस्तानी चाहते प्रचंड नाराज आहेत. त्यात अमित मिश्रानं झिम्बाब्वेचं अभिनंदन करणारं एक ट्विट केलं. झालं मिश्राजींनी ट्विट केलं आणि पाकिस्तान्यांचा पारा चढला आणि आपला राग त्यांनी त्याच्यावर काढला. अमित मिश्रानं काय म्हटलं? अमित मिश्रानं ट्विटमध्ये म्हटलंय की… “हा उलटफेर नाही… सामना झिम्बाब्वेच जिंकत होती. आमच्या शेजाऱ्यांसाठी हा वाईट दिवस.” अमित मिश्राच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक पाकिस्तानी संतप्त झाले आणि त्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली. अगदी ट्रोलही केलं.
अमित मिश्रा सोशल मीडियात चांगलाच अॅक्टिव्ह असतो. याआधी शोएब अख्तरनं विराट कोहली संदर्भात केलेल्या एका ट्विटनंतर अमित मिश्रानं त्याला जोरदार उत्तर दिलं होतं. हेही वाचा - T20 World Cup: ‘कोरोना झाला तरी मैदानात आला!’, मास्क लावून खेळताना ‘या’ खेळाडूचे फोटो Viral ट्विटनंतर मिश्रा ट्रोल या ट्विटनंतर अनेक पाकिस्तानी ट्रोलर्सनी कमेंट करण्यास सुरुवात केली. एकानं कमेंट करुन म्हटलं… “करिअर मध्ये काही चांगलं केलं असतं तर अशा प्रकारे लक्ष वेधून घेण्याची गरज पडली नसती… बिचारे मिश्राजी!”
तर आणखी एकाने म्हटलंय की ‘‘मला 1999 चा वर्ल्ड कप आठवला. जेव्हा झिम्बाब्वेनं भारताला 3 रन्सने हरवलं होतं. आज पाकिस्तान एक रन्सने हरला.”