वर्ल्ड कप फायनल, पाकिस्तान वि. इंग्लंड
मेलबर्न, 12 नोव्हेंबर: मेलबर्नमध्ये तब्बल 30 वर्षांनी पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन संघ आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पहिल्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 1992 साली वन डे वर्ल्ड कपची फायनल याच दोन टीममध्ये रंगली होती. त्यावेळी इम्रान खानच्या टीमनं इंग्लिश संघाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न राख केलं होतं. त्यानंतर त्यांना वन डे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तब्बल 27 वर्ष वाट पाहावी लागली होती. त्यामुळे 30 वर्षांपूर्वीचा तो बदला घेण्यासाठी जोस बटलर अँड कंपनी सज्ज झाली आहे. पण असं असलं तरी बाबरची सेनाही तितकीच तुल्यबळ आहे. दुसरी गोष्ट अशी की पाकिस्तानचा यंदाच्या वर्ल्ड कपमधला फायनलपर्यंतचा प्रवास अगदी 1992 च्या वर्ल्ड कपसारखाच आहे. पाकिस्तानचा ‘रोड टू फायनल…’ 1992 साली पाकिस्ताननं इम्रान खान यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळचा ग्रुप स्टेजपासून फायनलपर्यंतचा पाकिस्तानचा प्रवास आणि आताचा प्रवास सारखाच आहे.
मेलबर्नमध्ये काय होणार? 1992 साली पाकिस्ताननं इंग्लंडला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. यंदाही वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड फायनलमध्ये पोहोचले आहेत. पण बाबर आझम इम्रान खाननं घडवलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार की इंग्लंड 30 वर्षांपूर्वीच्या त्या पराभवाचा बदला घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. हेही वाचा - Sachin Tendulkar: ‘प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठीच…’, टीम इंडियाच्या पराभवावर सचिनचा ‘मास्टर स्ट्रोक’; Video फायनलसाठी मेलबर्न सज्ज दरम्यान फायनलसाठी मेलबर्न सज्ज झालं आहे. आज सामन्याच्या आदल्या दिवशी शहरात अनेक ठिकाणी वर्ल्ड कप फायनलच्या पार्श्वभूमीवर रोषणाई करण्यात आली होती. पण उद्याच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एमसीजीवर जमणाऱ्या हजारो प्रेक्षकांचा आणि जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होण्याचीही शक्यता आहे.
टी20 वर्ल्ड कप मेगा फायनल पाकिस्तान वि. इंग्लंड मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वा. हेही वाचा - Eng vs Pak: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा, इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये आनंद! पाहा काय आहे कारण? स्टार स्पोर्टस नेटवर्क, हॉट स्टारवर थेट प्रक्षेपण पाकिस्तानचा संभाव्य संघ - मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद हॅरीस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी इंग्लंडचा संभाव्य संघ - जोस बटलर (कॅप्टन), अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टन, मोईन अली, हॅरी ब्रुक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड, सॅम करन, आदिल रशीद