JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Video : 30 वर्षानंतर आलेल्या खास योगाचा मुंबईवर काय होणार परिणाम? राशीचक्रकारांनी सांगितलं भविष्य

Video : 30 वर्षानंतर आलेल्या खास योगाचा मुंबईवर काय होणार परिणाम? राशीचक्रकारांनी सांगितलं भविष्य

2023 या वर्षात मुंबईत राजकीय, आरोग्य, उद्योग कसे असणार आणि काय घडणार याविषयी सविस्तर माहिती राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी दिलीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 डिसेंबर : 2022 हे वर्ष आता संपत आलं आहे. 2023 हे नवीन वर्ष उजाडायला काही तासांचाच अवधी उरलाय. रविवारी 1 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या सन 2023 या वर्षात मुंबईत राजकीय, आरोग्य, उद्योग कसे असणार आणि काय घडणार याविषयी सविस्तर माहिती राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी दिलीय. 30 वर्षानंतर आला योग भविष्य हे एका प्रदेशापुरत मर्यादित नसतं तर ते संपूर्ण जगाला लागू होतं. त्यामुळे त्यात मुंबई शहर आलंच. 2023 वर्ष जानेवारी महिन्यापासूनच  चांगलं जाणार आहे. सगळे राजकीय प्रॉब्लेम शनिग्रहामुळे होतात. 30 वर्षानंतर शनी कुंभ राशीमध्ये आलाय. या वर्षात मोर्चा, युद्ध, अपघात हे प्रकार कमी होतील. राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये समजुतीचं वातावरण निर्माण होईल, असं आशादायी भविष्य उपाध्ये यांनी सांगितले आहे. Video : नाशिककरांसाठी 2023 ठरणार का लकी? रोजगार, पाऊस, पीकपाण्याबद्दल ज्योतिषांनी वर्तवलं भविष्य काय बदल होणार? 17 जानेवारी आणि 24 एप्रिलपासून महाराष्ट्रात खूप चांगले बदल होतील. विरोधी पक्ष समजुतीच्या पातळीवर येतील. नवीन उद्योगधंदे स्थापन झाल्यानं बेकारीचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर असेल. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत आगी लागण्याचं प्रमाण वाढलंय, हे प्रमाण भविष्यात कमी होईल.

2023 हे वर्ष जागतिक शांततेच, समंजस्याचं असणार आहे.2023 च्या शेवटी लोकं अध्यात्मकडे वळतील आणि उपासना करू लागतील.असं भविष्य उपाध्ये यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या