JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Shravan 2023: श्रावण महिन्यात शंकराची पूजा का केली जाते? शंकर आणि श्रावणाचा असा आहे संबंध

Shravan 2023: श्रावण महिन्यात शंकराची पूजा का केली जाते? शंकर आणि श्रावणाचा असा आहे संबंध

Shravan 2023: शंकराला 12 महिन्यांपैकी फक्त श्रावण महिना का आवडतो? शिव आणि श्रावण यांच्यात काय संबंध आहे, याविषयी पौराणिक कथा जाणून घेऊ.

जाहिरात

श्रावणात शंकराची पूजा का केली जाते

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : तुम्ही भोलेनाथाचे भक्त असाल आणि त्यांची पूर्ण भक्तिभावाने पूजा करत असाल तर तुम्हाला हे माहीत असेलच की, शंकराला श्रावण महिना सर्वात जास्त आवडतो. धार्मिक श्रद्धेनुसार, जो भक्त श्रावणामध्ये शंभू-महादेवाची खऱ्या भक्ती-भावानं पूजा करतो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, शंकराला 12 महिन्यांपैकी फक्त श्रावण महिना का आवडतो? शिव आणि श्रावण यांच्यात काय संबंध आहे, याविषयी पौराणिक कथा जाणून घेऊ. धार्मिक ग्रंथांनुसार, माता सतीने प्रतिज्ञा केली होती की, जेव्हाही ती जन्म घेईल तेव्हा पती म्हणून भगवान शिवालाच प्राप्त करेन. यासाठी तिने पिता राजा दक्ष यांच्या घरी देह त्यागला आणि हिमालय राजाच्या घरी पार्वतीच्या रूपात जन्म घेतला. असे मानले जाते की, माता पार्वतीने भगवान शिवांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे नंतर तिचा भगवान शंकराशी विवाह झाला. म्हणून भगवान शंकराला श्रावण महिना खूप आवडतो.

जेव्हा भोलेनाथ रुद्र अवतारात येतात - दुसर्‍या एका धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपतात आणि चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवही झोपतात आणि जेव्हा भगवान शिव झोपतात तेव्हा त्या दिवसाला श्यनोत्सव म्हणतात. याकाळात भोलेनाथ त्यांच्या रुद्र अवतारात असतात. असे मानले जाते की जेव्हा भगवान शिव आपल्या रुद्र अवतारात असतात तेव्हा ते खूप लवकर प्रसन्न होतात, परंतु या अवतारात ते लगेच कोपतातही. म्हणून श्रावण महिन्यात भगवान शंकराचा रुद्राभिषेक केला जातो, त्यामुळे या पूजेने ते प्रसन्न होऊन सर्वांना आशीर्वाद देतात, असे मानले जाते. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास श्रावणात सासरी गेले होते शिव - इतकेच नाही तर असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यात समुद्रमंथनातून निघालेले विष भगवान शिवाने प्यायले होते आणि भगवान शिव प्रथमच पृथ्वीवर आपल्या सासरच्या घरी आले. जिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यामुळे असे म्हटले जाते की, दरवर्षी श्रावण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवर येतात आणि सर्वांना आशीर्वाद देतात. या महिन्यात मर कंडू ऋषींचा पुत्र मार्कंडेयाने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त केला होता, असे सांगितले जाते. श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या