मुंबई, 24 सप्टेंबर : सर्व धर्मांमध्ये उपासनेशी संबंधित काही नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. यापैकी एक म्हणजे डोके झाकणे. पूजा करताना महिला आणि पुरुष दोघांनीही डोके झाकणे आवश्यक आहे. घरीही पूजा करताना डोके झाकले जाते. यासोबतच लोक मंदिर, गुरुद्वारा किंवा इतर धार्मिक स्थळी जातात तेव्हाही डोके झाकणे आवश्यक असते. पण तुम्हाला माहीत आहे का की धार्मिक स्थळी किंवा पूजेदरम्यान डोके का झाकले जाते? अनेकदा धार्मिक स्थळी गेल्यावर यआपण डोक्यावर रुमाल, ओढणी किंवा पदर घेतो. आपल्या वडील धाऱ्यांनी आपल्याला या गोष्टी शिकवलेल्या असतात. काही लोक याकडे देवाच्या आदराच्या दृष्टिकोनातून पाहतात. परंतु या धार्मिक श्रद्धा आणि परंपरेला वैज्ञानिक कारणेही जोडलेली आहेत. पूजेच्या वेळी डोके झाकणे का आवश्यक आहे, हे जाणून घेऊया दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंग यांच्याकडून.
लग्न-साखरपुड्याची अंगठी अनामिका बोटातच का घातली जाते? हे आहे कारणयामुळे धार्मिक स्थळांवर डोके झाकले जाते मंदिर, गुरुद्वारा आणि इतर धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना डोके झाकणे आवश्यक आहे कारण धार्मिक स्थळ हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते. देवाचा आदर करण्यासाठी डोके झाकले जाते. त्याचबरोबर डोक्यावर काहीही नसल्यामुळे पूजेच्या साहित्यावर केस पडू शकतात. यामुळे पूजेच्या वस्तू अपवित्र होतात आणि देव अशुद्ध पूजा साहित्य स्वीकारत नाही. याने पूजेचे फळ मिळत नाही. म्हणून धार्मिक स्थळी डोके झाकले जाते. शास्त्रानुसार पूजा करताना व्यक्तीचे मन इकडे तिकडे भटकू नये, त्यामुळेही डोके झाकणे आवश्यक आहे. नकारात्मक ऊर्जा केसांमध्ये प्रवेश करण्याचे एक कारण देखील आहे. नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करण्यासाठीही डोके झाकणे आवश्यक आहे. ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. पूजेदरम्यान डोके झाकण्याची ही आहेत शास्त्रीय कारणे विज्ञानानुसार, आकाशीय विद्युत लहरी उघड्या डोक्यात प्रवेश करतात आणि त्यांच्यावर सर्वात जास्त परिणाम करतात. यामुळे व्यक्तीला राग येणे, डोकेदुखी, डोळ्यांना त्रास होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच केसांमध्ये चुंबकीय शक्ती असते. अशा परिस्थितीत रोग पसरवणारे जंतू सहज त्याच्या संपर्कात येतात.
Vastu Tips : मोरपंखाच्या या साध्या सोप्या उपायाने होईल धनलाभ, हातात टिकेल पैसाडोके झाकल्याने या जंतूंपासूनही संरक्षण होते. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती धार्मिक स्थळी असेल, जिथे खूप लोक उपस्थित असतील, तर ही समस्या टाळण्यासाठी डोके झाकणे आवश्यक आहे.