मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu Tips : मोरपंखाच्या या साध्या सोप्या उपायाने होईल धनलाभ, हातात टिकेल पैसा

Vastu Tips : मोरपंखाच्या या साध्या सोप्या उपायाने होईल धनलाभ, हातात टिकेल पैसा

मोरपिसाच्या उपायाने नकारात्मक ऊर्जा दूर केली जाऊ शकते. वास्तुशास्त्रात मोराची पिसे घरात ठेवण्याचे निर्देशही दिलेले आहेत, ज्यामुळे धनलाभ होण्याचे योग निर्माण होतात.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 21 सप्टेंबर : आपल्या देशात मोरपीसाबाबत अनेक समजुती आहेत. पुराणात मोरपंख हे देवतांचे अलंकार मानले गेले आहे. विशेषत: मोराचे पंख हे भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या दागिन्यांपैकी एक असल्याने, कान्हाला मोरपीसे अर्पण केले जातात. वास्तुशास्त्रातही मोरपिसांना खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार मोरपीसे घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. वास्तुदोष निवारणासोबतचा मोरपीस घरात ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होते. भोपाळ येथील ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी मोरपिसाचे काही सोपे उपाय सांगितले आहेत.

काही झालं तरी या दिवशी यश निश्चित मिळणार; तुमच्यासाठी कोणता दिवस लकी इथं पाहा

मोरपीसे घरात कोणत्या दिशेला ठेवावीत? ज्योतिष शास्त्रानुसार मोरपीसामध्ये सर्व देवी-देवता आणि नऊ ग्रह विराजमान आहेत, त्यामुळे ते घरात ठेवल्याने घरातील लोकांची आर्थिक उन्नती होते. दुसर्‍या मान्यतेनुसार, घरात मोराचे पंख असल्यास घरात कोणतेही संकट येत नाही आणि सुख-शांती राहते. वास्तुशास्त्रानुसार मोरपीसे नेहमी घराच्या आग्नेय दिशेला ठेवावीत. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील वातावरण चांगले राहते. पैशांचा अपव्यय रोखते मोरपीस जर एखाद्या व्यक्तीला उधळपट्टीची सवय असेल किंवा कोणाकडे पैसे नसतील तर आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी मोरपीसे ठेवल्यास नक्की फायदा होईल. असे मानले जाते की पूजा घर किंवा मंदिरात मोरपीसे ठेवल्याने घरात समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतात. कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं मोरपीसे काल सर्प दोषापासून मुक्ती देतात ज्योतिष शास्त्र मानते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल तर त्या व्यक्तीने मोरपीसांबाबतचे उपाय करावेत. यासाठी अशा व्यक्तीने उशीखाली सात मोरपिसे ठेवून झोपावे. असे मानले जाते की हा उपाय केल्यास काल सर्प दोषापासून लवकर सुटका होते.
First published:

Tags: Lifestyle, Religion, Vastu

पुढील बातम्या