डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचे अंकशास्त्र
मुंबई, 22 जून : एखाद्या व्यक्तीला खूप यशस्वी डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिक व्हायचं असेल, तर त्याच्या जन्मतारखेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या 4, 6 आणि 7 हे अंक असणं गरजेचं आहे. 4 हा अंक श्रम दर्शवतो. हा अंक संघर्ष किंवा उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक शिस्तीशीही निगडित आहे. हा अंक तांत्रिक क्षमता देतो. तसंच, काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये तज्ज्ञताही देतो. 4 हा अंक उत्साहासाठी, तसंच प्रोफेशनल पातळीवर जबाबदार वर्तनासाठी गरजेचा असतो. डॉक्टर्सना अहोरात्र उत्साही आणि ऊर्जापूर्ण असणं आवश्यक असतं. तसंच, ते जबाबदारही असणं गरजेचं असतं. कारण कोणाचं तरी आयुष्य त्यांच्या हातात असतं.
6 हा अंक जबाबदारी, हीलिंग आणि यशप्राप्तीसाठीच्या जिद्दीचा निदर्शक आहे. डॉक्टर्स रोग बरा करतात. तसंच त्यांनी समुपदेशक म्हणूनही काम करणं अपेक्षित असतं. पेशंटना सुरक्षित वाटलं पाहिजे. तसंच, आपण योग्य व्यक्तीच्या हातात असून आपल्यावर उत्तम उपचार होतील असा विश्वास पेशंटना वाटणं आवश्यक असतं. अशा प्रकारचा हा विश्वास केवळ 6 या अंकातूनच येऊ शकतो. या तारखांना जन्मलेल्या मुली असतात भाग्यवान; अधिकारी बनतात, मोठ्ठा पगार मिळवतात 7 हा अंक विश्वासार्ह व्यक्तींचा निदर्शक आहे. हा खूप लकी अंक आहे. तसंच, हा अंक संबंधित व्यक्तीला नवी शास्त्रीय तंत्रं शिकण्याची प्रेरणा देतो. जागतिकीकरण आणि वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या सुधारणा यांमुळे डॉक्टर्सनी सतत शिकत राहणं, स्वतःची कौशल्यं वृद्धिंगत करत राहणं गरजेचं असतं. हे सारं 7 या अंकामुळे होतं. 7 हा अंक शास्त्रीय अभ्यासाचा निदर्शक आहे. या अंकांचं कॉम्बिनेशन संबंधित व्यक्तीला यशस्वी डॉक्टर बनवू शकतं. या जन्मतारखांचे लोक रुपावर लगेच भाळतात; विविधांगी असतं व्यक्तिमत्त्व डॉक्टरला स्पेशलायझेशन करायचं असेल आणि सर्जन व्हायचं असेल, तर संबंधित डॉक्टरच्या जन्मतारखेत 8 हा अंक असणं गरजेचं आहे. 8 हा अंक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या जन्मतारखेत नसेल, तर मोबाइल नंबरद्वारे ती उणीव भरून काढता येऊ शकते. लकी रंग : Blue & Green लकी अंक : 6, 7 दान : गायींना किंवा गरिबांना हिरवं धान्य दान करा. आजूबाजूच्या परिसरात बरीच हिरवी झाडं लावा आणि त्यांना कायम पाणी घाला.