अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 3 जून : वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. गेल्या अनेक पिढ्यांपासून ही प्रथा सुरू आहे. आता बदलत्या काळात या प्रथेला आधुनिक स्वरुप येत आहे. वर्धामध्ये काही पुरुषांनी एकत्र येत वेगळ्या पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी केली. वर्ध्यातील ऑक्सिजन पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात पुरुषांनी पत्नीच्या कपाळावर कुंकू लावले. पत्नीच्या पाय पडून त्यांना नमस्कार केला. वटवृक्षाला सपत्नीक प्रदक्षिणा घातल्या. त्याचबरोबर पर्यावरणाचं भान राखत वटवृक्षाचं रोपणही केलं.
काय आहे उद्देश ? पिढ्यानपिढ्या केवळ महिलाच वटपौर्णिमा साजरी करता. करत आल्या आहेत.. त्यासाठी महिला व्रत ठेवतात पतीच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पुरुषांनी महिलांकरिता वटपौर्णिमेच्या दिवशी दीर्घायुष्याची कामना का करू नये? असा प्रश्न आम्हाला पडला. त्यानंतर आम्ही देखील वडाची पूजा करण्याचं ठरवलं. आज वटपौर्णिमेच्या दिवशी पुरुषांनी पत्नीला हळदीकुंकू लावून चरणस्पर्श केला. तसंच पर्यावरणाचं भान जपण्यासाठी वृक्षारोपण केलं, अशी माहिती या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पुरुषांनी दिली. 34 वर्षानंतर लावलं कुंकू, ‘ती’नं वडही पूजला, वर्ध्यात दिसली आधुनिक सावित्री, Video प्रत्येक सण उत्सव साजरे करण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे.. वटवृक्षाचे मानवी आरोग्याला अनेक फायदे आहेत.. त्यामुळे कुठलाही सण उत्सव साजरे करताना पर्यावरण पूरक आणि पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याचे भान ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.