तुळशीचे रोप भेट द्यावे का?
मुंबई, 12 जुलै : काही वनस्पतींना हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं. यातील सर्वात पहिलं म्हणजे तुळशीचं रोप. हिंदू धर्मात असे मानले जाते की, तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी निवास करते. म्हणूनच घरा-घरांमध्ये तुळशीचे रोप लावल्याचे आपण पाहतो. तुळशी वृंदावनाची विशेष काळजी घेतली जाते, पाणी अर्पण करून तुळस वाढवली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते तिथं सदैव सुख-समृद्धी राहते. तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा ईशान्य मानली जाते. याशिवाय तुळशीच्या रोपाच्या पूजेचे काही खास नियम आहेत, पण आजचा प्रश्न असा आहे की, तुळशीचे रोप एखाद्याला भेट देणे योग्य आहे की नाही? तुळशीचे रोप कोणाला भेट म्हणून किंवा सत्कार करताना तुळशीचे रोप कोणाला द्यायचे की नाही? याविषयी ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलेली माहिती पाहू. तुळशीचे रोप भेट देणे योग्य आहे की नाही? वास्तुशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला तुळशीचे रोप दान करणे खूप शुभ मानले जाते. तुळशीला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. घरात तुळस लावल्यानं घरात समृद्धी येते. ही वनस्पती घरातील नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता वाढवते. एखाद्याने तुळस भेटवस्तू म्हणून दिल्यास तिचा आदर करा. तुळशीचे रोप घरात लावल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते, असे विज्ञानही मानते.
कोणत्या दिवशी तुळशीचे रोप दान करावे - तुळशीचे रोप एखाद्याला भेट देणे शुभ आहे, परंतु ते भेट देताना दिवसाची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपण एखाद्याला तुळस भेट देता तेव्हा ती पूर्णपणे निरोगी असावी आणि त्या घेणाऱ्या व्यक्तीने त्याची चांगली काळजी घ्यावी. याशिवाय रविवारी किंवा एकादशीला तुळशीचे रोप देऊ शकता. ज्योतिषशास्त्रात असे काही दिवस सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुळशीच्या रोपाला स्पर्श करणे निषिद्ध आहे. अशा कोणत्याही दिवशी तुळशीचे रोप इतर कोणत्याही व्यक्तीला भेट म्हणून देऊ नका. चातुर्मासात या नियमांचे करावे पालन; भगवान विष्णूची कुंटुंबावर राहील सदैव कृपा तुळशीचे रोप भेट देण्याचे नियम - वास्तुशास्त्रानुसार तुळशीची वनस्पती खूप शुभ आहे. त्यामुळे कोणत्याही धार्मिक सण, वाढदिवस, लग्न, गृहप्रवेश किंवा इतर कोणत्याही सामाजिक समारंभाला भेट देणे योग्य ठरेल. तुम्ही एखाद्याला तुळशीचे रोप भेट देता, पण ते प्राप्त करणार्या व्यक्तीने ते आपल्या घरात योग्यरित्या स्थापित केले पाहिजे आणि त्याची काळजी घ्यायला हवी. तुळशीचे रोप एखाद्या व्यक्तीला भेट देण्यापूर्वी, ते पूर्णपणे स्वच्छ करा आणि एका सुंदर भांड्यात भेट म्हणून सादर करा. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)