JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Hanuman Jayanti 2023 : कोल्हापुरातील 'या' प्राचीन मारूतीला आहेत 2 तोंड, पाहा काय आहे महत्त्व, Video

Hanuman Jayanti 2023 : कोल्हापुरातील 'या' प्राचीन मारूतीला आहेत 2 तोंड, पाहा काय आहे महत्त्व, Video

समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात अकरा मारुती स्थापन केले. मात्र कोल्हापुरात या व्यतिरिक्त एक प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण असे हे मारुतीचे मंदिर आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 6 एप्रिल :  रामनवमीनंतर काही दिवसांनी हनुमान जयंती देखील येते. त्या दिवशी ठिकठिकाणी हनुमान मंदिरात भाविक गर्दी करत असतात. कोल्हापुरातील असेच एक ऐतिहासिक द्विमुखी मारुती मंदिर आहे, या मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण मारुतीची मूर्ती पाहण्यासाठी भाविक नेहमी गर्दी करतात. . समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात अकरा मारुती स्थापन केले. मात्र कोल्हापुरात या व्यतिरिक्त एक प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण असे हे मारुतीचे मंदिर आहे. कुस्ती पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरात किती प्राचीन काळापासून मारुतीची उपासना केली जायची, हे यावरून लक्षात येते. पूर्वी मूळ कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीजवळचे ब्रह्मपुरी हे ठिकाण होते. या ठिकाणी अनेक प्राचीन अशी देवी-देवतांची मंदिरे पाहायला मिळतात. याच ब्रह्मपुरी परिसरातील हुतात्मा तोरस्कर चौकात हे द्विमुखी मारुतीचे मंदिर आहे. मूळ मंदिर हे छोटे आहे. पुढे कौलारू खापऱ्यांचा सभामंडप नंतर बांधण्यात आला आहे, असे हे जवळपास 200 वर्षांपूर्वीचे मंदिर आहे, असे येथील पुजारी किशोर निकम यांनी सांगितले. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले 11 मारुती माहिती आहेत का? घरबसल्या घ्या सर्वांचं दर्शन, Photos काय आहे वैशिष्ट्य ? या मारुतीच्या मंदिरातील मूर्ती हीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्ती साधारण तीन ते चार फूट उंच आहे. एकाच पाषाणाच्या दोन्ही बाजूला मारुतीची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. या प्रकारची मूर्ती इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. मूर्तीच्या समोर उभारल्यानंतर पाठीमागच्या मूर्तीचा चेहरा आपल्याला आरशाच्या माध्यमातून पाहता येतो. त्यानुसार आपण दोन्ही बाजूच्या मूर्ती पाहू शकतो. तर फक्त मागच्या बाजूची मूर्ती पाहण्यासाठी मागे छोटी देवळंही करण्यात आली आहे. कसं आहे मंदिर ? द्विमुखी मारुती मंदिर हे मुख्य मंदिर आणि कौलारू सभामंडप अशा रचनेचे आहे. सभामंडप हा मोठा असून कौलारू असल्यामुळे तिथे थोडा गारवा जाणवतो. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना आपल्याला चौकट ओलांडून थोडे खाली उतरावे लागते. पुढं चौथऱ्यावर मध्यभागी मारुतीची मूर्ती आणि बाजूला चार लाकडी खांब आहेत. चौथऱ्यावरील मुख्य मूर्ती शेजारीच शनिदेव आणि छोटी मारुतीची पाषाणात कोरलेली मूर्ती ठेवण्यात आली आहे. चौथऱ्याच्या खाली डाव्या बाजूला भगवान शंकराची पिंड आहे. तर, मुख्य मारुतीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूची मूर्ती पाहण्यासाठी वरच्या बाजूला एक आरसा लावण्यात आलेला आहे.

काय आहे धार्मिक महत्त्व ? ‘द्विमुखी किंवा दुतोंडी मारुती त्यांचे विशेष अध्यात्मिक महत्त्व नाही आहे. अशा प्रकारची कोणतीही रचना आपल्याला मूर्तीशास्त्र किंवा धर्मशास्त्राच्या कोणत्याही ग्रंथात नाही आहे. मात्र शिल्पकाराने घडवलेल्या या अद्भुत कलाकृतीकडे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणूनच आपण या मंदिराकडे पाहायला हवे, असे मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत रांणींगा यांनी सांगितले आहे.

गूगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

मंदिराचा पत्ता : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361, तोरस्कर चौक, स्टेशन रोड, कोल्हापूर - 416002

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या