चाफळचा दास मारुती - समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील 11 ठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापित केली आहेत. त्यातील पहिले मारुतीचे मंदिर हे चाफळचा वीर मारुती आहे. चाफळ हे ठिकाण उंब्रजवरून साधारण 11 कि.मी. अंतरावर आहे. अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना समर्थांनी चाफळ येथे केली.
शिराळ्याचा मारुती - सांगली जिल्ह्यात पहिला मारुती. बत्तीस शिराळा गावच्या मुख्य बस स्थानकाजवळच हे मारुतीचे मंदिर आहे. तब्बल 7 फूट उंच अशी इथे उत्तर दिशेला तोंड असलेली मारुतीची सुंदर मूर्ती या ठिकाणी आहे. इथे मूर्तीच्या चेहऱ्यावर सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी प्रकाश पडतो, हे या ठिकाणचे अजून एक वैशिष्ट्य