सूर्यग्रहणावेळी म्हणायचे मंत्र
मुंबई, 19 एप्रिल : गुरुवार, 20 एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. ग्रहणाच्या वेळी उपासनेचे पाठ आणि इतर शुभ कार्ये बंद राहतील, परंतु तुम्ही मंत्रजप करू शकता. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यदेवाचा मंत्र किंवा तुमच्या आवडत्या देवाच्या मंत्राचा जप करा. गरोदर महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी बाल शिव मंत्र किंवा श्री गर्भ रक्षांबिका स्तोत्रमचे पठण करावे. बाल शिव मंत्राला गर्भ रक्षा मंत्र असेही म्हणतात. या मंत्राच्या जपाने न जन्मलेल्या बालकाचे रक्षण होते. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांनी सूर्यग्रहणाच्या दिवशी राशीनुसार आणि गर्भवती महिलांनी कोणते मंत्र म्हणावेत, याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ. सूर्यग्रहण 2023: गर्भवती महिलांसाठी मंत्र - गर्भवती महिलांनी आपल्या होणाऱ्या मुलाचे रक्षण करण्यासाठी बाल शिव मंत्राचा जप करावा किंवा श्री गर्भ रक्षांबिका स्तोत्रमचा पाठ करावा. बाल शिव मंत्र: ओम बालशिवाय विद्महे काली पुत्राय धीमहि तन्नो बटुक प्रचोदयात् सूर्यग्रहणाच्या वेळी या मंत्राचा जप करा सूर्य बीज मंत्र: ओम ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नम: ओम ह्लीं बगलामुखी देव्यै सर्व दुष्टानाम वाचं मुखं पदम् स्तम्भय जिह्वाम कीलय-कीलय बुद्धिम विनाशाय ह्लीं ओम नम:. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे.
सूर्य ग्रहण 2023 सूर्य मंत्र राशीनुसार मेष: ओम अचिंताय नम: वृषभ: ओम अरुणाय नम: मिथुन: ओम आदिभुताय नम: कर्क: ओम वसुप्रदाय नम: सिंह: ओम भानवे नम: कन्या: ओम शांताय नम: तूळ: ओम इंद्राय नम: वृश्चिक: ओम आदित्याय नम: धनु: ओम शर्वाय नम: मकर: ओम सहस्त्र किरणाय नम: कुंभ: ओम ब्रह्मणे दिवाकर नम: मीन: ओम जयिने नम: हे वाचा - थोडे दिवस नाही मिळणार नशीबाची साथ; गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना वैताग आणणार इच्छापूर्ती सूर्यमंत्र - ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।। सूर्यग्रहण वेळ 2023 - 20 एप्रिल रोजी सकाळी 07:04 वाजता सूर्यग्रहण सुरू होईल आणि सूर्यग्रहण दुपारी 12:29 वाजता संपेल. हे वाचा - सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)