सोमवती अमावस्या पूजा
मुंबई, 16 फेब्रुवारी : यावर्षी सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी सोमवती अमावस्या आहे. या दिवशी जे स्नान करून दान करतात त्यांना अक्षय पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी पूर्वजांची पूजा केली जाते, जेणेकरून ते आनंदी होऊन आपल्याला आनंदी जीवनाचा आशीर्वाद देतील. पूर्वज सुखी असतात तेव्हा त्यांच्या वंशजांचे जीवन सुखी राहते, त्यांची अहोरात्र प्रगती होते. कुटुंबात सुख-शांती नांदते. पूर्वज नाराज असतील तर त्यांचे वंशज दुःखी जीवन जगतात. घरात कलह, नोकरी, व्यवसायात प्रगती होत नाही, संतती वाढत नाही. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ मृत्युंजय तिवारी यांनी, सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणती कामे करू नयेत, याविषयी सांगितलेली माहिती पाहुया. सोमवती अमावस्येला काय करू नये 1. अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा अनादर करू नका. अमावस्येला स्नान केल्यानंतर पूर्वजांना जल अर्पण करायला विसरू नका. धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज लोकात पाण्याची कमतरता असते, म्हणून तर्पण पाण्यासोबत दिल्यास पूर्वजांना प्रसन्नता मिळते. 2. गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना दिलेल्या अन्नातून पूर्वजांना त्यांचा वाटा मिळतो, असे मानले जाते. या कारणास्तव अमावस्येच्या दिवशी या जीवांना दुखावू नये. तुम्ही जे काही अन्न तयार करता, त्यातील काही भाग या सजीवांनाही द्या. तो भाग पितरांना मिळेल आणि ते आनंदी होतील. 3. अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या वंशजांकडून तर्पण, पिंडदान, श्राद्ध, दान इत्यादींची प्रतीक्षा करतात. जेव्हा त्यांना ते मिळत नाही तेव्हा त्यांना वाईट वाटते आणि शाप देतात, अशी धार्मिक धारणा आहे. 4. अमावस्येच्या दिवशी मांस, मद्य किंवा इतर उपद्रवी पदार्थांचे सेवन करू नका. यामुळे नकारात्मकता वाढते. हा तुमच्या प्रगतीतील अडथळा मानला जातो. सोमवती अमावस्या ही पुण्यप्राप्तीची संधी आहे, तिचा लाभ घ्यावा.
5. या दिवशी ब्रह्मचर्य नियमांचे उल्लंघन करू नका. सोमवती अमावस्या मुहूर्त - माघ कृष्ण अमावस्या तिथी सुरू होते: फेब्रुवारी 19, दुपारी 04:18 माघ कृष्ण अमावस्या तिथी समाप्त होते: 20 फेब्रुवारी, दुपारी 12:35 वाजता हे वाचा - शनी-सूर्य कुंभमध्ये!30 वर्षांनी महाशिवरात्रीला असा दुग्धशर्करा योग; 3 राशी जोमात (सूचना : येथे दिलेली माहिती हस्तरेषा शास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)