JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Somvati Amavasya 2023 : आज सोमवती अमावस्या, चुकूनही करू नका ही कामे

Somvati Amavasya 2023 : आज सोमवती अमावस्या, चुकूनही करू नका ही कामे

हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील पहिली सोमवती अमावस्या 20 फेब्रुवारी साजरी केली जाईल.

जाहिरात

सोमवती अमावस्येला ही कामे टाळा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 फेब्रुवारी: हिंदू धर्मात सोमवती अमावास्येला विशेष महत्त्व आहे. या विशेष दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याचा विधी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील पहिली सोमवती अमावस्या 20 फेब्रुवारी साजरी केली जाईल. शास्त्रात सांगण्यात आले आहे की सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि अर्पण केल्याने विशेष लाभ होतो. यासोबतच अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. वैदिक शास्त्रांमध्ये सोमवती अमावस्येच्या संदर्भात काही नियम आणि कामे सांगण्यात आली आहेत, ज्या केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो. योगिराज श्री शंकर महाराज : ``मै कैलास का रहनेवाला । मेरा नाम है शंकर"॥

सोमवती अमावस्येला हे काम करा

धार्मिक मान्यतांनुसार, सोमवती अमावस्येला गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीला विशेष लाभ मिळतो. असे केल्याने व्यक्तीवर भगवान विष्णूची कृपा कायम राहते. पवित्र स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देण्यास विसरू नका. तसेच सूर्यमंत्राचा उच्चार करताना अर्घ्य द्यावे. असे केल्याने साधकाला आरोग्य आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो.

सोमवती अमावस्येला ही कामे टाळा

शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, सोमवती अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने तामसिक अन्नाचे सेवन अजिबात करू नये. या दिवशी मांस, मद्य, कांदा, लसूण इत्यादींचे सेवन करण्यास मनाई आहे. 2023च्या पहिल्या सूर्यग्रहणात या 3 राशींवर होणार विपरीत परिणाम, जाणून घ्या राशी सोमवती अमावस्येच्या दिवशी या दिवशी घरात वादविवाद होऊ नयेत याची विशेष काळजी घ्या. तसेच या दिवशी वाईट शब्द वापरू नका. सोमवती अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे. यासोबतच ब्रह्मचर्य पाळावे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या