श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे.
श्री शंकर महाराज योगीराज होते, याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. शंकर महाराज नेहमी म्हणत, ‘सिद्धीच्या मागे लागू नका!’
१५० वर्षांचे आयुष्य जगलेले शंकर महाराज आजही अनेकांसाठी गूढ आहेत, दाढी असणारे, निरागस भाव डोळ्यात असणारे आणि गुडघे मुडपून बसलेले एक तेजस्वी पुरुष अशी त्यांची ओळख.
धुम्रपान करणारे, मद्यपान करणारे आणि अगदी शिवीगाळ करणारे असे हे शंकर महाराज कधीही इतर योग्यांप्रमाणे भगव्या वस्त्रांत नसत. ते नेहमी साध्या पेहरावात असत.
सिगरेटच्या धूराने प्रसन्न होणाऱ्या शंकर महाराज्यांच्या फोटो समोर लोक आगरबत्ती न लावत सिगरेट पेटवतात.
त्यांना दागिन्यांचा शौक होता मात्र ते दागिना अंगावर ठेवत नसत. ताबडतोब तो भक्तांना वाटून टाकत. त्यांच्या हाताच्या 10 ही बोटात रत्न जडित अंगठ्या असायच्या.
महाराजांचा आवडता आकडा तेरा होता. महाराजांच्या जन्माबाबत दंतकथा असल्या तरी महाराजांचा जन्म १३ तारखेला झाल्याचं सांगतात.
भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील भाषा महाराजांना येत होत्या व त्या भाषिक व्यक्तीबरोबर ते त्याच्याच भाषेत संवाद साधत होते.