JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / क्षुल्लक वाटणाऱ्या या गोष्टी केल्यानं मागे लागू शकते शनीची साडेसाती, आधीच जाणून घ्या

क्षुल्लक वाटणाऱ्या या गोष्टी केल्यानं मागे लागू शकते शनीची साडेसाती, आधीच जाणून घ्या

शास्त्रानुसार इतरांच्या वस्तू वापरण्याचा संबंध शनिदेवाच्या वक्रदृष्टीशी आहे. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. जाणून घेऊया कोणत्या गोष्टींमुळे शनिचा आपल्याला त्रास होऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑक्टोबर : ज्योतिषशास्त्रानुसार जन्मपत्रिकेतील शनिदेवाचे स्थान एखाद्या व्यक्तीची स्थिती आणि दिशा ठरवते. कुंडलीत शनीची अनुकूल स्थिती जीवनात सुख, आनंद आणि संपत्ती आणते. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमुळे जीवनात खूप त्रास सहन करावा लागतो. अनेकदा जाणूनबुजून किंवा नकळत आपण अनेक वेळा अशा चुका करतो, ज्यामुळे शनिदेव क्रोधित होतात. शनिदेवाची वक्रदृष्टी कोणावरही पडली तर व्यक्कीला त्यामुळे त्रास सहन करावा लागतो, विविध अडचणी मागे लागतात. शास्त्रानुसार इतरांच्या वस्तू वापरण्याचा संबंध शनिदेवाच्या वक्रदृष्टीशी आहे. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. जाणून घेऊया कोणत्या गोष्टींमुळे शनिचा आपल्याला त्रास होऊ शकतो. शनिदेवाची वक्रदृष्टी टाळण्याचे उपाय - पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते. शनिदेवाच्या वक्रदृष्टीने व्यक्तीला त्रास होऊ लागतो. इतरांच्या वस्तू वापरल्याने व्यक्तीला त्रास सोसावा लागतो. पार्टी किंवा कार्यक्रमाला जाण्यासाठी अनेकदा आपण मित्रांकडून कपडे-शूज-गॉगल इ. घेतो आणि घालतो. पण ही चूक तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते. इतरांचे कपडे परिधान केल्याने घरात गरिबी येते. तसेच इतरांची अंगठी घालणे देखील अशुभ आहे. ही दुर्दैवाची सुरुवात ठरू शकते. अंगठी किंवा रत्न किंवा इतर कोणी घातलेली कोणतीही धातूची वस्तू वापरू नये. यामुळे शनिदेव क्रोधित राहतात आणि ग्रहांवर विपरीत परिणाम होतो.

दुसऱ्याची चप्पल आणि बूट घालू नयेत. शनिदेव व्यक्तीच्या चरणी वास करतात असे म्हणतात. अशा स्थितीत इतरांची चप्पल आणि जोडे परिधान केल्याने शनिदेवाचा कोप होऊ शकतो. अनेक वेळा लोक इतरांचे पेन मागून वापरतात, जे शास्त्रानुसार योग्य नाही. यामुळे जीवनात नकारात्मकता वाढते आणि त्याचे अशुभ परिणाम दिसून येतात. हे वाचा -  दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या