JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ganesh Chaturthi 2022: गणपतीची प्रतिष्ठापना करताना या गोष्टी चुकवू नका, दिशा आहे महत्त्वाची

Ganesh Chaturthi 2022: गणपतीची प्रतिष्ठापना करताना या गोष्टी चुकवू नका, दिशा आहे महत्त्वाची

गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण घरात मूर्तीची स्थापना करत असाल तर काही गोष्टी आणि नियमांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून या नियमांविषयी जाणून घेऊया.

जाहिरात

विनायक चतुर्थी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 ऑगस्ट : भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार यंदा गणेश चतुर्थीचा सण देशभरात 31 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव 10 दिवस चालतो आणि या दिवसांपर्यंत गणपतीच्या मूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना केली जाते आणि विधीनुसार पूजा केली जाते. या काळात लोक उपवास करतात आणि मनोभावे लाडक्या गणपती पूजा-आरती करतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता. श्रीगणेश हा सर्व देवतांमध्ये पूजनीय आहे. कोणत्याही सणाच्या आणि पूजेच्या निमित्ताने सर्वप्रथम श्रीगणेशाचे स्मरण केले (Ganesh Chaturthi 2022) जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण घरात मूर्तीची स्थापना करत असाल तर काही गोष्टी आणि नियमांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून या नियमांविषयी जाणून घेऊया. या दिशेला मूर्तीची प्रतिष्ठापना करा - पंडित घनश्याल यांच्या मते ब्रह्मस्थान म्हणजे पूर्व दिशा आणि ईशान्य दिशा ही श्री गणेशाची मूर्ती बसवण्यासाठी शुभ दिशा मानली जाते आणि याच दिशेला गणेशाची मूर्ती ठेवावी. गणेशाची प्रतिष्ठापना करताना चुकूनही दक्षिण आणि नैऋत्य दिशेला करू नये. यामुळे घरातील व्यक्तीचे मोठे नुकसान होऊ शकते. हे वाचा -   नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा अशा प्रकारे प्रतिष्ठापना करा - मूर्तीची स्थापना करण्यासाठी सर्व प्रथम स्वच्छ चौरंग घ्यावा किंवा जी काही आपण मूर्तीसाठी बैठक व्यवस्था केली असेल ती स्वच्छ असावी. नंतर त्यावर गंगाजल किंवा पवित्र जल शिंपडून शुद्ध करा. नंतर चौरंगावर लाल कापड पसरून घ्या. यानंतर त्यावर श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर श्रीगणेशाची स्नान पूजा करावी. म्हणजे श्री गणेशाच्या उजव्या बाजूला पाण्याचे भांडे ठेवा आणि एका बाजूला सुपारी ठेवा. या दरम्यान भगवान गणेशाच्या मंत्राचा जप करा - ‘ओम गणपतये नमः।’ हे वाचा -  येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या