येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

निधीवन (Nidhivan) हे वृंदावनातीलच एक जंगल आहे. जिथे तुळशी-कदंब सारखी झाडे आहेत. इथे झाडा-झुडपांमध्ये एक रंगमहाल नावाचा छोटा राजवाडा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : असं म्हटलं जातं की ब्रजभूमीचा प्रत्येक काना-कोपरा भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेचा साक्षीदार आहे. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्यांच्या किशोरावस्‍थेपर्यंतच्या घटनांच्या खुणा आहेत. श्रीकृष्ण येथे गवळणींसोबत रासलीला करायचे. त्याच्या हातात बासुरी, डोक्यावर मोराच्या पिसांचा मुकुट आणि जवळ गायी आणि वासरे असायची. वृंदावन हे जगातील सर्वात सुंदर असल्याचे त्यांनी सांगितले होते, त्यामुळे वृंदावनाच्या प्रत्येक पावलावर राधा-कृष्णाची गुंज ऐकू येतो.

निधीवन (Nidhivan) हे वृंदावनातीलच एक जंगल आहे. जिथे तुळशी-कदंब सारखी झाडे आहेत. इथे झाडा-झुडपांमध्ये एक रंगमहाल नावाचा छोटा राजवाडा आहे. हा तो राजवाडा आहे, ज्याबद्दल आजही इथे रात्री कृष्णाची रासलीला होते, असे मानले जाते. पण, त्यांना कोणीच पाहू शकत नाही. संध्याकाळ होताच निधीवन प्रेक्षकांसाठी बंद होते. त्यानंतर येथे कोणी राहत नाही. विशेषत: शरद पौर्णिमेच्या रात्री निधीवनात जाण्यास सक्त मनाई आहे.

निधीवनचे सेवात गोस्वामी म्हणतात की, 'ही श्रीकृष्णाची माया आहे, त्यांची इथे अजूनही रासलीला सुरू असते. तुळशीच्या वेली गोपिका बनतात आणि जंगलातील इतर झाडे ग्वाल-बाल बनतात. वृंदावनातील लोक सांगतात की, दिवसा येथे भाविकांच्या येण्या-जाण्यावर कोणतेही बंधन नाही. पण संध्याकाळी निधीवन रिकामे केले जाते. रात्री इथे चोरून थांबून रासलीला पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे भान हरपणे किंवा वेडा झाल्याचे प्रकार घडतात.

हे वाचा -  Krishna Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कोणता? जन्माष्टमीची पूजा आणि व्रत कसे करावे?

रात्री काय होणार हे जाणून घेण्यासाठीच काही लोक निधीवनमध्ये येतात. निधीवनमध्ये राधाराणीचे प्राचीन मंदिर आहे. याशिवाय 'रंगमहाल' हे ठिकाण आहे, ज्याच्या छताखाली सूर्यास्तानंतर श्रीकृष्णासाठी नैवेद्य ठेवले जातात. पण सकाळ झाली की तिथे काहीच दिसत नाही. श्रीकृष्ण येथे येत असल्याचे या खुणा असल्याचे भक्त सांगतात.

हे वाचा - Janmashtami 2022: म्हणून पंचामृत सर्व महत्त्वाच्या पूजेमध्ये वापरतात, श्रीकृष्णाशी आहे असा संबंध

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 18, 2022, 6:02 PM IST

ताज्या बातम्या