मराठी बातम्या /बातम्या /religion /

नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

ज्या लोकांची नखे लांबसडक असतात, त्यांच्यात सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती जास्त असते. असे लोक त्यांच्या सर्जनशील कार्यशैलीमुळे खूप नाव कमावतात.

ज्या लोकांची नखे लांबसडक असतात, त्यांच्यात सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती जास्त असते. असे लोक त्यांच्या सर्जनशील कार्यशैलीमुळे खूप नाव कमावतात.

ज्या लोकांची नखे लांबसडक असतात, त्यांच्यात सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती जास्त असते. असे लोक त्यांच्या सर्जनशील कार्यशैलीमुळे खूप नाव कमावतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 ऑगस्ट : सामुद्रिक शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, एखादा जाणकार व्यक्ती समोरच्या माणसाच्या शरीराची रचना पाहून त्याचा स्वभाव आणि भविष्य याबद्दल बरेच काही सांगू शकतो. प्रत्येक माणसाची शरीररचना वेगळी असते. परंतु, सामुद्रिकशास्त्रात नमूद केलेल्या भौतिक रचनेच्या आधारे माणसाबद्दल अचूक माहिती मिळू शकते. आजच्या लेखात भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा नखांच्या आकाराच्या आधारे व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगत (Nail Shape) आहेत.

- लांब नखे -

सामुद्रिक शास्त्रात असे सांगितले आहे की, ज्या लोकांची नखे लांबसडक असतात, त्यांच्यात सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती जास्त असते. असे लोक त्यांच्या सर्जनशील कार्यशैलीमुळे खूप नाव कमावतात. हे लोक जे काही करतात ते उत्साहाने आणि आनंदाने करतात.

- गोल किंवा अंडाकृती नखे

सामुद्रिक शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, ज्या लोकांची नखे गोलाकार किंवा अंडाकृती असतात, असे लोक स्वभावाने अनुकूल मानले जातात. हे लोक आपल्या दिलदार आणि आनंददायी वागण्याने इतर लोकांना पटकन आपले बनवतात. या लोकांच्या शब्दांचा इतर लोकांवर खूप प्रभाव पडतो.

- रुंद नखे

समुद्रशास्त्रात असे मानले जाते की, रुंद नखे असलेले लोक बुद्धीने चालाक असतात. हे लोक आपली सर्व काम विचार करून करतात, ज्यामुळे ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात.

- पिवळी नखे -

सामुद्रिकशास्त्रात पिवळ्या नखे असणं शुभ मानलं जात नाही. असे म्हटले जाते की पिवळी नखे असलेल्या लोकांना गरिबीचा सामना करावा लागू शकतो. पिवळे नखे असलेले लोक त्यांचे बहुतेक आयुष्य गरिबीत घालवतात.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

वाकडी नखे -

सामुद्रिक शास्त्रानुसार असे लोक ज्यांची नखे वाकडी-तिकडी, कोरडी आणि बोटाकडे झुकलेली असतात, त्यांचे आयुष्य दुःखात व्यतीत होते, परंतु हे लोक स्वभावाने धैर्यवान असतात आणि आपले काम पूर्ण करतात.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion