JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / सुट्टीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं की नाही? पानांचा रंगही चेक करा नाहीतर...

सुट्टीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं की नाही? पानांचा रंगही चेक करा नाहीतर...

तुळशीचे प्रकारही असतात याबाबत काही माहिती नसल्यामुळे नेमकी कोणती तुळस घरात लावावी हे अनेकजणांना कळत नाही.

जाहिरात

असं म्हणतात, ज्या घरात तुळशीचं रोप असतं, तिथे लक्ष्मीचा वास असतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 10 जून : आपल्या घरात तुळशीचं रोप असेल आणि आपण ते नियमितपणे दिवा लावून पूजत असाल, तर काही नियम लक्षात घेणंही गरजेचं असतं. जसं की, एकादशी आणि रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये. तुळशीला स्वच्छ हातांनीच स्पर्श करावा. आंघोळ न करता तुळशीला अजिबात स्पर्श करू नये. शिवाय तुळशीचं रोपही छान स्वच्छ ठेवावं. तुम्हाला माहितीये, शास्त्रानुसार तुळशीचे दोन प्रकार आहेत. एक रामा आणि दुसरी श्यामा. या दोन्हीपैकी नेमकी कोणती तुळस घरात लावणं शुभ ठरतं, हे आज आपण पाहूया. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या रोपाचा अनेक आजारांवर औषध म्हणूनही उपयोग केला जातो. ज्योतिषशास्त्रात तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. असं म्हणतात की, ज्या घरात तुळशीचं रोप असतं, तिथे लक्ष्मीचा वास असतो. परंतु घरात मात्र श्यामा नाही, तर रामा तुळशीचं रोप लावणं उत्तम मानलं जातं. ही तुळस घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. रामा तुळशीची पूजा केली जाते, तर श्यामा तुळशीचा बहुतांशी औषधी वनस्पती म्हणून उपयोग केला जातो.

तुळशीचे प्रकारही असतात याबाबत काही माहिती नसल्यामुळे नेमकी कोणती तुळस घरात लावावी हे अनेकजणांना कळत नाही. परंतु श्यामा तुळशीच्या पानांचा रंग काळा असतो आणि रामा तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असतो, हाच काय तो फरक. श्यामा तुळशी बऱ्याचदा जंगलात आढळते. डॉक्टरांनी केला चमत्कार! मृत बाळाला अवघ्या 4 मिनिटांत पुन्हा जिवंत केलं; पाहा LIVE VIDEO खरंतर हे दोन्ही प्रकार एकमेकांना पूरक असतात. परंतु घरात केवळ रामा तुळशीचं रोप लावावं, असं अयोध्येचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कार्तिक महिन्यात तुळशीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या