JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Name astrology: राजेशाही आयुष्य जगतात या नावाचे लोक, तुमचं नाव आहे का यात?

Name astrology: राजेशाही आयुष्य जगतात या नावाचे लोक, तुमचं नाव आहे का यात?

Name astrology : ज्योतिष शास्त्रानुसार नावाचे पहिले अक्षर लोकांना भाग्यवान बनवते. असे म्हटले जाते की, विशिष्ट अक्षराने नावाची सुरुवात होत असलेल्यांवर कुबेर देवाची विशेष कृपा राहते.

जाहिरात

या अक्षरांनी नाव सुरू होणारे लोक जगतात राजेशाही जीवन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य याविषयी बरंच काही सांगते. नावाच्या पहिल्या अक्षराचा व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो, असे मानले जाते. शास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख, जन्मस्थान आणि वेळ यांच्या आधारे त्याची राशी ओळखली जाते. ज्यावरून अनेकजण बाळाचे नाव ठेवत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार नावाचे पहिले अक्षर लोकांना भाग्यवान बनवते. असे म्हटले जाते की, विशिष्ट अक्षराने नावाची सुरुवात होत असलेल्यांवर कुबेर देवाची विशेष कृपा राहते. त्यांना आयुष्यात पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही. असे लोक राजासारखे जीवन जगतात. अक्षर A - ज्योतिष शास्त्रानुसार नावाची सुरुवात A अक्षराने होत असलेले लोक भाग्यवान असतात. ज्या लोकांचे नाव A अक्षराने सुरू होते. ते स्वाभिमानी, मेहनती आणि प्रामाणिक असतात. त्यांच्यात नेतृत्वगुण चांगले असतात. त्यामुळे ते कोणत्याही क्षेत्रात उच्च स्थान मिळवतात. भगवान कुबेर यांची त्यांच्यावर विशेष कृपा राहते.

अक्षर S - S अक्षराने नावाची सुरुवात होणारे लोक बुद्धिमान आणि मेहनती असतात. त्यांना जीवनात नशिबाची पूर्ण साथ मिळते. कुबेर देवाची कृपा सदैव त्यांच्यावर राहते. 4 दिवसात या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! नोकरी-धंद्यात बक्कळ कमाईचे योग अक्षर P - ज्योतिषशास्त्रानुसार, P अक्षर असलेले लोक बुद्धिमान असतात. त्यांना सर्वकाही जाणून घेण्याची इच्छा असते. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांना जीवनात उच्च स्थान मिळते. या लोकांवर कुबेर देवाचे असीम आशीर्वाद राहतात. आयुष्यात पैशाची कमतरता भासत नाही. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या