राशीनुसार जून महिना कोणासाठी कसा?

जून 2023 मध्ये सूर्य आणि बुध या 2 मोठ्या ग्रहांच्या राशी बदलणार आहेत. जूनमध्ये बुध ग्रह दोनदा तर सूर्य एकदा राशी बदलेल.

शिवाय, न्यायदेवता शनी जूनमध्येच कुंभ राशीत वक्री होणार आहे. शनिची 140 दिवस वक्री चाल असेल, ज्यामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल.

बुध जूनमध्ये अस्ताला जाईल, 22 दिवसांच्या अस्तानंतर जुलैमध्ये बुधाचा उदय होईल. ग्रहांच्या बदलामुळे 3 राशीच्या लोकांसाठी जून महिना शुभ राहील.

7 जून रोजी बुध ग्रह आपली राशी बदलणार आहे. बुध 7 जून रोजी संध्याकाळी 07:58 वाजता वृषभ राशीत प्रवेश करेल.

15 जून रोजी संध्याकाळी 06:29 वाजता सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्या क्षणी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल त्याच वेळी सूर्याची मिथुन संक्रांती होईल.

17 जून रोजी रात्री 10:56 वाजता शनी कुंभ राशीत वक्री होईल. यानंतर शनि 140 दिवस उलटी चाल करेल. ग्रहांच्या वक्री स्थितीत अधिक अशुभ परिणाम मिळू शकतात.

जूनमध्ये दोन मोठ्या ग्रहांचे राशी बदल, शनीची वक्री स्थिती आणि बुधाचा अस्त काळ यामुळे सर्व राशींवर शुभ-अशुभ प्रभाव निश्चित पडणार

ज्योतिषशास्त्राच्या आधारावर वृषभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी जून 2023 चांगला राहील.

या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. नवीन नोकरीची ऑफर मिळेल.

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here