JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Numerology: रविवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी काही खास गोष्टी

Numerology: रविवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी काही खास गोष्टी

रविवारी जन्मलेल्या बहुतांश व्यक्ती मुलाखतींमध्ये आपला प्रभाव दाखवण्यात यशस्वी ठरतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मे : रविवारी जन्मलेल्या व्यक्तींवर 1 या सूर्याच्या अंकाचा प्रभाव असतो. शुभ रंग: Yellow and orange शुभ दिवस: रविवार शुभ अंक: 1 आणि 3 शुभ धातू: सोनं शुभ दिशा: पूर्व वास्तवापासून दूर पळतात या 4 राशी, स्वप्नात गुरफटण्याची असते आवड स्ट्राँग एरियाज / सामर्थ्य / गुण / यूएसपी: रविवारी जन्मलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यप्रेमी, उत्कृष्ट प्लॅनर, चांगली ओळख असलेल्या, आत्मविश्वासपूर्ण मनाच्या, कलात्मक, नेतृत्व गुण असलेल्या, हुशार, चांगल्या व्यावहारिक निर्णय घेणाऱ्या, समाजाभिमुख, देशप्रेमी, कमिटेड आणि आश्वासक, इतरांना मनापासून मदत करणाऱ्या, कुशल, जीवनाचा परिपूर्ण आनंद घेणाऱ्या असतात. या शिवाय, या व्यक्ती नातेसंबंधांमध्ये विश्वासार्ह, इतरांचं मनोरंजन करणाऱ्या, उत्कृष्ट विद्यार्थी असतात. त्यांच्याकडे धाडसी निर्णय घेण्याची धमक असते. रविवारी जन्मलेल्या बहुतांश व्यक्ती मुलाखतींमध्ये आपला प्रभाव दाखवण्यात यशस्वी ठरतात. सुधारणा करण्यायोग्य बाबी: रविवारी जन्मलेल्या व्यक्तींकडे वर्चस्व गाजवण्याची वृत्ती असते. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये या व्यक्तींना निराशा मिळते. या व्यक्ती मनातील भावना व्यक्त करू शकत नाही. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते आणि त्यांच्या मनात नेहमी विचित्र विचार येतात. 5 चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी, म्हणून फॉलो करा वास्तु टिप्स योग्य करिअर आणि प्रोफेशन: रविवारी जन्मलेल्या व्यक्ती सौर उत्पादनांचं उत्पादन आणि विक्री व्यवसायिक, ब्रोकर्स, थिएटर आर्टिस्ट, टेक्निकल सपोर्टर, जमीन विक्रेते, संशोधक आणि विश्लेषक, खेळाडू, बांधकाम व्यावसायिक, संरक्षण किंवा विमान सेवा कर्मचारी म्हणून चांगलं काम करू शकतात. या शिवाय, कुटीर उद्योगाची मालकी, राजकारण, फॅब्रिक्स उत्पादन किंवा गारमेंटची किरकोळ विक्री, कायदा या क्षेत्रात या व्यक्ती प्रगती करू शकतात. रविवारी जन्मलेल्या व्यक्ती आयात-निर्यात एजंट, मनुष्यबळ सल्लागार आणि फूड इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होऊ शकतात. सल्ला: दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. करिअरला गती देण्यासाठी सुरुवातीला इतरांवर अवलंबून राहा. दान: आश्रमात किंवा मंदिरात कच्ची हळद किंवा पिवळा भात दान करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या