प्रत्येक मंगळवारी ओंकार महाराज भक्तांच्या समस्या सोडवतात.
भोपाळ, 21 जून : बुंदेलखंडचा परिसर आजकाल बागेश्वर धाम सरकारमुळे देशभरात चर्चेत आहे. स्वतः पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि त्यांच्या छतपुरातील बागेश्वर धाममध्ये भरणाऱ्या दरबारांची जोरदार चर्चा आहे. याच धर्तीवर सागरच्या नाथेश्वर धामचे पंडित ओंकार महाराजही लोकांच्या मनातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय सुचवतात. नाथेश्वर धाममध्येच त्यांचे दरबार भरतात. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी ओंकार महाराज दिव्य दरबारात भक्तांच्या समस्या सोडवतात. या दरबारात सागर जिल्ह्यासह आसपासच्या अनेक ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यावेळी भाविकांना त्यांच्या जीवनाशी संबंधित समस्यांवर उपाय मिळतात.
ओंकार महाराजांचं नाथेश्वर धाम गाठणं अवघड नाही. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळहून किंवा देशाची राजधानी असलेल्या दिल्लीहून किंवा इतर शहरांमधूनही तुम्ही नाथेश्वर धामला सहज पोहोचू शकता. नाथेश्वर धाम सिद्धपीठ आश्रम सागर जिल्ह्यातील मालथोन तालुक्यात आहे. Mumbai News : रायगडावर शिवरायांचं चांदीचं शिल्प, कुणी केलं तयार? पाहा हा VIDEO दरम्यान, कुरळे केस, चमकदार चेहरा, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कणखर आवाज अशी ओंकार महाराजांची ओळख निर्माण झाली आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्याप्रकारे लोकांच्या समस्यांवर उपाय सांगतात, त्याचप्रमाणे ओंकार महाराजही लोकांकडून समस्या अर्ज स्वीकारून त्यांवर उपाय सांगतात. मात्र लोकांनी आपले प्रश्न विचारायच्या आतच ओंकार महाराजांचं उत्तर लिहून तयार असतं. सोशल मीडियावर ओंकार महाराजांच्या नावाने अनेक फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनेल असून त्यावर त्यांची माहिती दिलेली आहे.