जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai News : रायगडावर शिवरायांचं चांदीचं शिल्प, कुणी केलं तयार? पाहा हा VIDEO

Mumbai News : रायगडावर शिवरायांचं चांदीचं शिल्प, कुणी केलं तयार? पाहा हा VIDEO

Mumbai News : रायगडावर शिवरायांचं चांदीचं शिल्प, कुणी केलं तयार? पाहा हा VIDEO

शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमातील शिवाजी महाराजांचं चांदीचं शिल्प कुणी तयार केलं माहिती आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 21 जून : छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा राज्याभिषेक सोहळा नुकताच पार पडला. या निमित्तानं रायगडावर झालेल्या मुख्य सरकारी कार्यक्रमातील छत्रपतींच्या चांदीच्या प्रतिमेची सध्या जोरदार चर्चा आहे. ही प्रतिमा कुणी साकारली हे माहिती आहे का? त्याचबरोबर मुंबईसह देशभरात असलेले छत्रपती शिवाजी महाराज, पु ल देशपांडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लालबहादूर शास्त्री सचिन तेंडुलकर यांचे पुतळे मुंबईतल्या एकाच कलाकारानं साकारले आहेत. कोण आहे हा कलाकार? त्याचा आजवरचा प्रवास कसा झालाय हे पाहूया जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‍्स म्हणजे कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी स्वर्गच. चित्रकला, शिल्पकला, हस्तकला अशा वेगवेगळ्या कलांमधील तारे जेजेमधूनच पुढे येतात. असाच जेजे स्कूल ऑफ आर्ट‍्समधील एक तारा म्हणजे हे शिल्पकार नितीन गोराडे. त्यांनी छत्रपचती शिवाजी महारांजापासून ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत असंख्य पुतळे साकारले आहेत. गोराडे यांनी 2002 साली पु.ल. देशपांडे यांचा आठ फुट उंचीचा मोठा पुतळा तयार करण्याचं आव्हान यशस्वी पेललं होतं. आजही प्रभादेवीतल्या  पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये तो पुतळा पाहता येतो. ज्येष्ठ कलाकार प्रभाकर पणशीकर यांनी तो पुतळा पाहून नितीन यांची पाठ थोपटली होती.

News18लोकमत
News18लोकमत

नितीन यांनी आजवर लालबहादूर शास्त्री (रिगल सिनेमाजवळील पुतळा), शहीद तुकाराम ओंबळे (गिरगाव चौपाटी), शिवाजी महाराज (कळवा येथील पुतळा) यांसारखे वेगवेगळे पुतळे त्याने साकारले आहेत. 2008 साली आमीर खानच्या गजनी चित्रपटासाठी आमीरच्या वेगळ्या लुकचा पुतळा साकारण्याचे काम नितीन यांनी केलं होतं. केले आहे. त्यासाठी स्वत: आमिर खाननं जगभरातील कलाकारामधून नितीनची निवड केली होती. देशातील अनेक प्रसिद्ध मल्टिप्लेक्समध्ये आमीरचे हे पुतळे झळकले होते. एकटं राहणाऱ्यांचे संपणार हाल, एकाच क्लिकवर मिळेल घरगुती जेवण, पाहा Video टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा नितीन यांना  सुरुवातीपासूनच चित्रकलेची आवड होती. तिसरीत असताना घराच्या जवळच गणपती बनवण्याच्या कारखान्यात ते जाऊ लागले. या कारखान्यात त्यांनी अनेक गोष्टी शिकल्या. नितीन यांचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. घरची हालाखीची परिस्थिती असूनही त्यांनी नितीन यांच्या चित्रकलेला पाठिंबा दिला. नववीमध्ये असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तीन फूट अर्धपुतळा तयार करण्याचे काम त्यांना मिळाले आणि कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना त्याने ते काम पार पाडले. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ताडदेवच्या म्युन्सिपल हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्याने जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‍समध्ये पोर्ट्रेट या विषयात स्पेशलायझेशन करून डिग्री घेऊन नितिनने २००१ पासून प्रोफेशनली आपल्या कार्यास सुरुवात केली. मोबाईलवर बकरा सिलेक्ट करा आणि झालं काम, बकरी ईदला घरबसल्या द्या कुर्बानी, कसं? पाहा Video ‘माझे बाबा टॅक्सी ड्रायव्हर होते. पण, त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला शिल्पकला शिकता आली. मी आजवर 500 पेक्षा जास्त पुतळे तयार केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त काम करण्याचं भाग्य मला लाभलं.  मी एक ते बारा फूट उंचीपर्यंतचे पुतळे साकारले आहेत. पंचधातू, चांदी यासारख्या विविध घटकांचा वापर करत मी ते तयार करतो. आणखी काही नव्या संकल्पना डोक्यात असून त्या प्रत्यक्षात उतरवण्याचं काम सध्या सुरू आहे,’ अशी माहिती नितीन यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात