मुंबई, 30 सप्टेंबर : दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ललिता पंचमी साजरी केली जाते. ललिता पंचमीला उपांग ललिता व्रत असेही म्हणतात. शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पूजन केले जाते. यावेळी ललिता पंचमी व्रत 30 सप्टेंबर 2022 रोजी आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, या दिवशी माता ललिताची पूजा करणे खूप शुभ आहे. या देवीची आराधना केल्याने सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. जाणून घेऊया ललिता व्रतातील काही महत्त्वाच्या गोष्टी. ललिता पंचमीचे महत्त्व - पौराणिक कथेनुसार, एकदा देवी सतीला तिच्या वडिलांचा अपमान सहन करावा लागला होता. त्यामुळे नाराज होऊन देवी सतीने यज्ञात प्राण त्याग केला. यामुळे दुःखी झालेले भगवान शिवमाता सतीचा देह घेऊन इकडे तिकडे फिरत राहिले. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा समतोल बिघडू लागला. त्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने सतीचे दोन भाग केले. यानंतर भगवान शिवाने तिला आपल्या हृदयात धारण केले, म्हणून माता ललिता हे सतीचे रूप मानले जाते आणि तिला ललिता या नावाने संबोधले जाते.
ललिता पंचमी पूजन पद्धत - धार्मिक श्रद्धेनुसार ललिताची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते. ललिता पंचमीला देवीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा सुरू करावी. यासाठी पूजास्थानाची स्थापना करून त्यावर माता ललिता यांच्यासह भगवान शिव आणि स्कंदमातेची मूर्ती स्थापित करा. पूजेच्या साहित्यात कुंकू, अक्षता, हळद, चंदन, गुलाल, फुले, दूध, पाणी, फळे इत्यादींचा समावेश करावा. देवीसमोर उदबत्ती व दिवा लावावा. देवीला आरती अर्पण करावी. ललिता सहस्रनामाचे पठण करावे. यामुळे देवीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)