कामिका एकादशी व्रत कथा
मुंबई, 12 जुलै : कामिका एकादशीचे व्रत गुरुवारी, 13 जुलै रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशी व्रत पाळले जाते. या व्रताचे पालन केल्याने मनुष्य पापमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो. जे कामिका एकादशीचे व्रत पाळतात, ते नीच योनीमध्ये जन्म घेत नाहीत. एकदा धर्मराज युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णांकडून आषाढ कृष्ण एकादशी व्रताची पद्धत आणि महिमा जाणून घ्यायचा होता. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, या एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. ब्रह्मदेवांनी नारद मुनींना कामिका एकादशीचे महत्त्व सांगितले होते, त्याची कथा अशी आहे. कामिका एकादशी व्रत कथा - एके काळी एका गावात एक ठाकूर राहत होता. तो खूप रागीट स्वभावाचा होता. एके दिवशी त्याचे एका ब्राह्मणाशी भांडण झाले. त्या काळात त्यांनी एका ब्राह्मणाचा वध केला. नंतर त्याने आपल्या गुन्ह्याबद्दल माफी मागितली आणि अंतिम संस्कार करण्याची परवानगी मागितली. पण, त्या गावातील ब्राह्मणांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यास त्याला नकार दिला आणि ठाकूर यांच्यावर ब्राह्मणाची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला. ब्राह्मणांनी त्या ठाकूरच्या घरी जेवण घेण्यासही नकार दिला. ब्राह्मण लोक त्याच्या कोणत्याही शुभ कार्याला उपस्थित राहिले नाहीत.
काही काळ निघून गेला. एके दिवशी त्याला एक ऋषी भेटले. त्या ठाकूरने त्यांना मनातील व्यथा सांगितली आणि संपूर्ण घटना सत्य सांगितली. मग त्यांनी ऋषींना विचारले की, ब्रह्म हत्येचे पाप कसे दूर होईल? तेव्हा ते ऋषी म्हणाले की तू कामिका एकादशीचे व्रत कर. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला हे व्रत पाळले जाते. मुनींनी ठाकूर यांना कामिका एकादशी व्रताची पद्धत व महत्त्व सविस्तर सांगितले. चातुर्मासात या नियमांचे करावे पालन; भगवान विष्णूची कुंटुंबावर राहील सदैव कृपा ऋषींनी सांगितल्याप्रमाणे, ठाकूर यांनी कामिका एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूची पूजा केली. रात्री ते विष्णूच्या मूर्तीजवळ झोपले होते, तेव्हा त्यांना स्वप्नात श्रीहरी दिसले. भगवान विष्णूंनी त्याला ब्रह्म हत्येच्या अपराधातून मुक्त केले आणि त्याला क्षमा दिली. जे कामिका एकादशीच्या रात्री पितरांसाठी दिवा लावतात, त्यांच्या पितरांना जगात अमृतासारखं पुण्य प्राप्त होतं. कामिका एकादशीच्या व्रताचे महत्त्व ऐकणारेही पापमुक्त होऊन वैकुंठाला जातात. ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितले की जो कोणी कामिका एकादशीचे व्रत पाळतो आणि तुपाचा दिवा लावतो त्याला स्वर्गात स्थान मिळते. तो पापमुक्त होतो. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)