JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Pitradosh: अतृप्त पूर्वजांना शांत करण्याची संधी! ज्येष्ठ अमावस्येला या उपायांनी घालवा घरातील पितृदोष

Pitradosh: अतृप्त पूर्वजांना शांत करण्याची संधी! ज्येष्ठ अमावस्येला या उपायांनी घालवा घरातील पितृदोष

ज्येष्ठ अमावस्या तिथीला नाराज पूर्वजांना शांती देण्यासाठी उपाय केले जातात. त्यांची नाराजी दूर करून कुटुंबाची प्रगती व्हावी, म्हणून आशीर्वाद घ्या. आपले पूर्वज अतृप्त असतील तर घरात पितृदोष असतो.

जाहिरात

पितृदोष घालवण्याचे उपाय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जून : जून महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर सूर्याची पूजा आणि दान करण्याचा विधी आहे. ज्येष्ठ अमावस्या तिथीला नाराज पूर्वजांना शांती देण्यासाठी उपाय केले जातात. त्यांची नाराजी दूर करून कुटुंबाची प्रगती व्हावी म्हणून आशीर्वाद घ्या. आपले पूर्वज अतृप्त असतील तर घरात पितृदोष असतो. यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती थांबते, सतत आरोग्य बिघडते. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी अमावस्येची दिलेली माहिती, स्नान आणि दान करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता? आपण अतृप्त पूर्वजांना कसे शांत करू शकतो? याविषयी जाणून घेऊ. ज्येष्ठ अमावस्या तिथी मुहूर्त - पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या शनिवार 17 जून रोजी सकाळी 09.11 वाजता सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी रविवार, 18 जून रोजी सकाळी 10.06 वाजेपर्यंत वैध असेल. उदयतिथीच्या आधारे अमावस्या 18 जून रोजी आहे. त्याच दिवशी स्नान, दान आणि पूजा केली जाईल.

अमावस्या स्नान-दान शुभ मुहूर्त - 18 जून रोजी ज्येष्ठ अमावस्येला स्नान आणि दानाचा शुभ मुहूर्त सकाळी 07:08 ते दुपारी 12:37 पर्यंत आहे. यामध्ये देखील सकाळी 08.53 ते 10.37 पर्यंत लाभ-उन्नती मुहूर्त आहे, तर सकाळी 10.37 ते 12.37 पर्यंत अमृत-सर्वोत्तम मुहूर्त आहे. अमावस्येला पितर पूजेच्या वेळा- या अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करण्याची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 02.30 पर्यंत आहे. या काळात पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण इत्यादी विधी करून घ्यावेत. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास अमावस्येच्या उपायांनी पितर कसे प्रसन्न होतील? ज्येष्ठ अमावस्येला स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर पितरांना प्रसन्न करण्यासाठी पाण्याने तर्पण करावे. त्या वेळी हातात कुशाचा पवित्र धागा धारण करा. पितरांना पाण्यात तीळ घालून तर्पण अर्पण करावे. पितृ लोकात पाण्याचे दुर्भिक्ष असते, असे मानले जाते. जल अर्पण केल्यानं पितर तृप्त होऊन आशीर्वाद देतात. यामुळे पितृदोष दूर होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. झाडुला लक्ष्मी का मानतात? वास्तुनुसार घरातील झाडूविषयी या गोष्टी महत्त्वाच्या अमावस्येचे धार्मिक महत्त्व - ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांची देवता अर्यमाची पूजा करावी. तो इंद्राचा भाऊ मानला जातो. अमावस्येला अर्यमाची पूजा केल्याने पितृदोषही शांत होतो. अमावस्येच्या दिवशी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याच्या मुळास जल अर्पण करावे. यामुळे देवतांचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. जूनमध्ये या 5 राशींवर बुध मेहरबान! संपत्ती वाढेल, नोकरी-व्यवसायात लाभाचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या