या यात्रेत सर्व रथांचं संपूर्ण बांधकाम लाकडाचं असतं.
शशिकांत ओझा, प्रतिनिधी पलामू, 21 जून : जगन्नाथ पुरीच्या ऐतिहासिक रथयात्रेला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने भगवान जगन्नाथांच्या गजराने अवघी पुरी नगरी दुमदुमून गेली आहे. ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरातून ही ऐतिहासिक रथयात्रा निघते. आषाढ द्वितीयेला प्रारंभ होणाऱ्या या यात्रेत दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. ओडिशा राज्यात रथयात्रेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यासोबतच झारखंड, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये जत्रा म्हणून हा उत्सव साजरा होतो. झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील चैनपूर गडाहून 1832 सालापासून जगन्नाथ रथयात्रा काढली जाते. या यात्रेमागे एक अतिशय रोमांचक कथा सांगितली जाते. चैनपूर गडाचे राजा जयनाथ सिंह यांना विवाहानंतर अनेक वर्ष उलटूनही वडील होण्याचं सुख अनुभवता येत नव्हतं. त्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले मात्र काही गुण येत नव्हता. अखेर त्यांनी पुरीला जाऊन भगवान जगन्नाथांचा रथ खेचण्यास हातभार लावला आणि त्यांचा प्रसाद घरी घेऊन आले. त्यानंतर वर्षभरातच त्यांच्या घरात पाळणा हलला. तेव्हापासून झारखंडच्या पलामू भागात जगन्नाथ रथयात्रा काढली जाते. जयनाथ सिंह यांनी आपल्या पुत्राचं नावही जगन्नाथ सिंह असं ठेवलं होतं.
देवाची स्नान क्रिया पार पडल्यानंतर 56 भोग अर्पण केले जातात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथ रथयात्रा काढण्याची परंपरा आहे. पूर्वीच्या दशकांत भगवान जगन्नाथांसाठी 56 भोग पुरीतूनच आणले जायचे. आता दीड किलोमीटरच्या मार्गावर यात्रेचं आयोजन केलं जातं. यावेळी भक्तांना प्रसाद म्हणून अनारसे दिले जातात. Yoga Day : हाडं गोठवणारी थंडी आणि श्वास रोखायला लावणारी कसरत, जवानांनी -5 डिग्रीमध्ये केलं योगासन या यात्रेत सर्व रथांचं संपूर्ण बांधकाम प्रामुख्याने लाकडाचं असतं. भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगर भ्रमण करतात. बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे रथयात्रेत त्यांचा रथ सर्वांत पुढे असतो. तर, मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो.