JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / घरात पितृदोष, पूर्वज नाराज असल्यास या 5 गोष्टींवरून कळतं; लगेच बदलाव्या या गोष्टी

घरात पितृदोष, पूर्वज नाराज असल्यास या 5 गोष्टींवरून कळतं; लगेच बदलाव्या या गोष्टी

असे मानले जाते की, पूर्वज नाराज असतील तर कुटुंबातील व्यक्तींच्या आयुष्यात बऱ्याच उलथापालथी होऊ शकतात. सुखी जीवन जगण्यासाठी पितरांचे आनंदी राहणेही अत्यंत आवश्यक आहे.

जाहिरात

पितृदोष उपाय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 एप्रिल : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की पितृपक्षाच्या वेळी आपले पूर्वज आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. पितृपक्षात पितरांची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी दानधर्म आणि पिंडदान केल्यानं पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. असे मानले जाते की, पूर्वज नाराज असतील तर कुटुंबातील व्यक्तींच्या आयुष्यात बऱ्याच उलथापालथी होऊ शकतात. सुखी जीवन जगण्यासाठी पितरांचे आनंदी राहणेही अत्यंत आवश्यक आहे. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा सांगत आहेत, पूर्वज नाराज असतील किंवा पितृदोष कसा ओळखायचा. पितरांच्या नाराजीची संकेत - घरामध्ये विनाकारण कलह: जर तुमच्या घरात खूप भांडणे, वाद-विवाद होत असतील, घरातील लोकांची विनाकारण भांडणे होत असतील तर पितृदोष असू शकतो. कामांमधील अडचणी : जर तुम्ही अनेक दिवसांपासून एखादे काम करण्याचा विचार करत असाल आणि त्या कामात सतत अडथळे येत असतील किंवा मेहनत करूनही तुमच्या कामात यश येत नसेल. म्हणजे तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज असू शकतात.

संतती संबंधित अडचणी: जर तुमची मुले तुमचे ऐकत नसतील, नीट वागत नसतील तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या पूर्वजांना संतुष्ट करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन : जर तुमच्या लग्नाची चर्चा बरेच दिवस सुरू असेल, पण लग्न जुळत नसेल, वारंवार बोलणी होत नसेल किंवा वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत असतील. तर हे पितृदोषाचे कारण असू शकते. रामायण टीव्हीवर दिसण्यासाठी पडद्यामागे इतका झाला होता खटाटोप; 2 वर्षे चालला वाद अनावश्यक नुकसान : काही काम करत असताना अचानक तुमचे नुकसान होऊ लागले किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत असेल तर हे पितृदोषामुळेही होऊ शकते. पितरांना प्रसन्न करण्याचे उपाय - फोटो लावणे: जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पितृदोष आहे, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या पितरांचे हसतमुख चित्र लावावे. हे चित्र घराच्या दक्षिण-पश्चिम भिंतीवर किंवा कोपऱ्यात लावावे. मान्यतेनुसार असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. शनीच्या ग्रहस्थितीमुळं दुर्मिळ शश महापुरुष योग; या 5 राशीच्या लोकांसाठी वरदान वंदन: मान्यतेनुसार सकाळी उठल्यानंतर आपल्या पितरांना नमन केलं पाहिजे आणि शक्य असल्यास फोटोला हार अर्पण करावेत. पूर्वजांचे विशेष दिवस विसरू नका: तुम्ही पूर्वजांचे विशेष दिवस जसे की, त्यांची श्राद्ध किंवा पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. असे केल्याने पितर प्रसन्न होतात. या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करा. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. शनी मागे लागलाच म्हणून समजा; जीवनात अशी कामं करणाऱ्यांना शनी सोडत नाही कधी (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या