रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका पहिल्यांदा 1987 ते 1988 च्या दरम्यान डीडी नॅशनलवर प्रसारित करण्यात आली. ही मालिका लगेचच लोकांना खूप आवडली. लोक दर रविवारी आपापली कामं सोडून टीव्ही समोर बघायला बसायचे, पण ही मालिका बघण्यासाठी लोकांना जितका आनंद मिळाला, त्यापेक्षा जास्त त्रास रामानंद यांना ती बनवताना, परवानग्या मिळवताना झाला होता.
वास्तविक, रामायणावर कोणताही टीव्ही शो प्रसारित व्हावा, अशी कोणाचीही त्यावेळी इच्छा नव्हती, तरीही रामानंद सागर यांनी हार मानली नाही आणि 'रामायण' प्रसारित करण्याची परवानगी मिळवण्यासाठी ते जवळपास दोन वर्षे सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत राहिले. (फोटो क्रेडिट्स: Instagram @anaaya_says)
रामानंद सागर यांना श्रीकृष्ण, श्रीराम आणि देवी दुर्गा यांच्या कथा टीव्हीच्या माध्यमातून जनतेला दाखवण्याची मनापासून इच्छा होती. एक प्रयोग म्हणून, त्यांनी प्रथम 'विक्रम आणि वेताळ' तयार केले, जेणेकरून पौराणिक कथांमध्ये लोकांना रुची आहे की, नाही याचा त्यांना अंदाज घ्यायचा होता. 1985 मध्ये आलेली ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. (फोटो क्रेडिट्स: Instagram @sumaniyapradeep189)
त्यानंतर रामानंद सागर यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट 'रामायण'वर काम करण्यास सुरुवात केली, परंतु तत्कालीन सरकार आणि दूरदर्शन 'रामायण'वर टीव्ही शो करण्याच्या कल्पनेने नाराज दिसले. तथापि, रामानंद यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून 'रामायण'चे तीन भाग बनवले, परंतु ते प्रसारित करण्याची परवानगी मिळविण्यासाठी त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि दूरदर्शन मंत्रालयात जवळपास 2 वर्षे फिरावे लागले. (फोटो क्रेडिट्स: Instagram @bhakti_gyan)
दूरदर्शनने पहिला पायलट भाग नाकारला, कारण सांगितलं की, त्यामुळे वाद निर्माण होईल. दूरदर्शनच्या सूचनांचे पालन करून त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा पायलट एपिसोड बनवले, पण त्यालाही मान्यता मिळाली नाही. यामध्ये रामानंद सागर यांचा बराच पैसा आणि वेळ वाया गेला. ते अस्वस्थ होते, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाही. सरकारी उत्तर कळावे म्हणून ते अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मंडी हाऊसमध्ये तासनतास थांबायचे. (फोटो क्रेडिट्स: Instagram @king_sunillahri)
रामायणातील काही संवादांमुळे अनेकवेळा अधिकाऱ्यांनी त्यांचा अपमान केला. खूप प्रयत्नांनंतर दूरदर्शनने सहमती दर्शवली, पण तरीही सरकार परवानगी देण्याच्या बाजूने नव्हते, पण एके दिवशी परिस्थिती बदलली. अजित कुमार पंजा हे माहिती आणि प्रसारण मंत्रीपदावर विराजमान झाले तेव्हा 'रामायण' प्रसारित करण्याची परवानगी मिळाली. या टीव्ही शोमध्ये अरुण गोविळ यांनी राम, दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका, सुनील लहिरी यांनी लक्ष्मण, अरविंद त्रिवेदी यांनी रावण आणि दारासिंह यांनी हनुमानाची भूमिका केली होती. त्याची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन रामानंद सागर यांनी केले होते. (फोटो क्रेडिट्स: Instagram@bhakti.ki.leela) (माहिती स्रोत: रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांचे पुस्तक 'अॅन एपिक लाइफ: रामानंद सागर फ्रॉम बरसात टू रामायण')