गुरुपौर्णिमा 2023 कधी आहे?
मुंबई, 22 जून : दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरूंची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुशिष्य परंपरेत विशेष आहे. या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. सनातन धर्मात असे म्हटले आहे की, गुरूशिवाय परम ज्ञान आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होत नाहीत. केंद्रीय संस्कृत विद्यापीठ पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांनी गुरुपौर्णिमा कधी आहे? तिथी, पूजा मुहूर्त आणि महत्त्व याविषयी दिलेली माहिती पाहुया. गुरुपौर्णिमा 2023 तारीख - पंचांगानुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा 02 जुलैच्या रात्री 08:21 वाजता सुरू होईल. सोमवार, 03 जुलै रोजी संध्याकाळी 05:08 वाजता समाप्त होईल. त्यामुळे या वर्षी गुरुपौर्णिमा सोमवार, 3 जुलै रोजी साजरी होणार आहे. गुरुपौर्णिमा 2023 पूजेचा शुभ मुहूर्त - गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 05:27 ते 07:12 आणि सकाळी 08:56 ते 10:41 असा आहे. त्यानंतर दुपारी 02:10 ते 03:54 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मयोग, इंद्र योग आणि बुधादित्य राजयोग तयार झाले आहेत.
जीवनात गुरूचे महत्त्व - गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।। तिन्ही देवतांमध्येही गुरूचे स्थान सर्वोच्च आहे, असे संस्कृत श्लोकांतून सांगण्यात आले आहे. गुरु ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. तो परम ब्रह्म आहे, त्या गुरूला नमस्कार असो. असा श्लोकाचा अर्थ होतो. दुसरीकडे, कबीर दास यांनी गुरूचे महत्त्व सांगताना लिहिले आहे – गुरु गोविन्द दोऊ खड़े, काके लागू पाय। बलिहारी गुरु आपने, गोविन्द दियो बताय।। 4 दिवसात या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! नोकरी-धंद्यात बक्कळ कमाईचे योग गुरुपौर्णिमेला वेद व्यास जयंती - गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा वेद व्यास जयंती असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, महर्षी कृष्णद्वैपायन वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता, त्यामुळे हा दिवस व्यास जयंती किंवा व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. त्यांनी महाभारताची रचना केली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेद व्यासांची पूजा केली जाते. समजून घेण्यापेक्षा एकमेकांच्या चुका काढत राहतात; या जन्मतारखांची जोडी नाही जमत गुरुपौर्णिमेला बुद्धांनी पहिला उपदेश केला - भगवान बुद्धांनी सारनाथमध्ये गुरु पौर्णिमेला म्हणजेच आषाढ पौर्णिमा तिथीला पहिला उपदेश केला. बोधगयामध्ये ज्ञान प्राप्त केल्यानंतर ही पहिलीच वेळ होती, जेव्हा त्यांनी आपल्या ज्ञानाने लोकांना प्रबोधन केले. त्यामुळे गुरुपौर्णिमेचा दिवस बौद्ध धर्मासाठीही महत्त्वाचा आहे. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)