JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ganesh Chaturthi 2022: रंकालाही राजा बनवणारा गणपतीचा हा एकाक्षरी मंत्र; विघ्न हरतो भक्तांची

Ganesh Chaturthi 2022: रंकालाही राजा बनवणारा गणपतीचा हा एकाक्षरी मंत्र; विघ्न हरतो भक्तांची

या मंत्राने राजा कदर्म आणि चित्रांगत यांना एका सामान्य क्षत्रियातून राजाधिराजाची पदवी दिली आहे. स्वतः माता पार्वतीनेही याचा जप केला आहे, ज्याबद्दल गणेश पुराणातही अनेक कथा सांगितल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट : श्रीगणेशाच्या उपासनेसाठी अनेक विधी आणि पुराण आहेत. परंतु त्याच्या एकाक्षरी मंत्राचा जप आणि अनुष्ठान अनेक पटींनी अधिक फायदेशीर मानले जाते. रंकाला राजा बनवण्याची क्षमता ज्याच्यात आहे. या मंत्राने राजा कदर्म आणि चित्रांगत यांना एका सामान्य क्षत्रियातून राजाधिराजाची पदवी दिली आहे. स्वतः माता पार्वतीनेही याचा जप केला आहे, ज्याबद्दल गणेश पुराणातही अनेक कथा सांगितल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तोच एकाक्षरी मंत्र आणि त्याचा प्रभाव सांगणाऱ्या कथा जाणून (Ganesh Chaturthi 2022) घेऊया. गणेशाचा एकाक्षरी मंत्र आणि जप पद्धत - नावाप्रमाणेच गणपतीचा एकाक्षरी मंत्र फक्त एका अक्षराचा आहे. हे अक्षर ‘गं’ आहे, ज्याचा एक लाख वेळा जप केल्यावर विधी पूर्ण होतो. गणेश पुराणानुसार, या मंत्राचा जप श्रावण शुक्ल चतुर्थीपासून भाद्रपद शुक्ल चतुर्थीपर्यंत एक महिना गणपतीच्या एक किंवा 108 मूर्ती बनवून करा. विधी पूर्ण झाल्यावर हवन, नैवेद्य आणि ब्राह्मणांना जेवण वाढून मूर्तीचे पवित्र नदी किंवा तलावात विसर्जन करावे. माता पार्वतीनेही केली होची पूजा, कर्दम आणि नल बनले राजा - पंडित रामचंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवी पार्वतीनेही गणेशाच्या एकाक्षरी मंत्राचे पठण केले आहे. गणेश पुराणानुसार, त्रिपुरासुराचा वध करूनही जेव्हा भगवान शंकर बराच काळ कैलासात पोहोचले नाहीत, तेव्हा चिंताग्रस्त माता पार्वतीला तिचे वडील हिमालय यांनी गणेशाच्या एकाक्षरी मंत्राचा विधी करण्यास सांगितले होते. हे वाचा -  येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान तसेच राजा कदर्म आणि चित्रांगद यांनाही या मंत्राचा जप केल्याने सामान्य क्षत्रियांपासून राजा ही पदवी मिळाली. पौराणिक कथेनुसार, जेव्हा राजा कर्दमने भृगु ऋषींना आपले राजा होण्याचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी ध्यान केल्यानंतर त्याच्या मागील जन्मातील गणेशाच्या एक अक्षराचा मंत्र जपण्याचे कारण सांगितले. तसेच राजा नलने गौतम ऋषींना स्वतःबद्दल विचारले असता त्यांनीही राजराजेश्वर असण्याचे कारण हाच मंत्र सांगितला. हे वाचा -   कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं एकाक्षरी मंत्राने पतीचा वियोग दूर झाला एकाक्षरी मंत्र प्रेयसीचा वियोग दूर करणाराही मानला जातो. गणेश पुराणानुसार, एकेकाळी शिकारीला गेलेल्या चित्रांगद राजाला सर्प मुलींनी अधोलोकात नेऊन कैद केले होते. तेव्हा नारदजींच्या सांगण्यावरून पतीच्या वियोगाने दुःखी झालेल्या चित्रांगदाची पत्नी इंदुमती हिने एकाक्षरी मंत्राने गणेशाची पूजा केली. यावर प्रसन्न होऊन गणेशाने सर्प मुलींना चित्रांगदला तुरुंगातून मुक्त करण्याची प्रेरणा दिली, ज्यामुळे इंदुमतीच्या पतीचा वियोग दूर झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या