JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / यंदा भाऊबीजेला जुळून आलेत 3 शुभ योग, औक्षण-टिळा लावण्याची वेळ पाहुन घ्या

यंदा भाऊबीजेला जुळून आलेत 3 शुभ योग, औक्षण-टिळा लावण्याची वेळ पाहुन घ्या

कार्तिक शुक्ल द्वितीया अपराण्हकाली असेल त्या दिवशी यमद्वितीया / भाऊबीज साजरी करावी. बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.42 वाजता कार्तिक शुक्ल प्रतिपदा संपून द्वितीया सुरू होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑक्टोबर : भाऊबीज सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. याला यम द्वितीया, भाऊबीज, भत्रु द्वितीया इत्यादी नावांनीही ओळखलं जातं. यंदा भाऊबीज सण 26 ऑक्टोबर, बुधवारी आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना घरी बोलावतात, तिलक लावून औक्षण करतात, स्नेहभोजन होते. त्या बदल्यात भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा सांगतात की, या वर्षी भाऊबीजेला सर्वार्थ सिद्धीसह तीन शुभ योग आहेत. जाणून घेऊया या शुभ योगांबद्दल आणि भावाला औक्षण करण्याची वेळ. भाऊबीज 2022 मुहूर्त - आज बुधवारी दुपारी 2.42 पर्यंत कार्तिक शुक्ल प्रतिपदा असली तरी बलिप्रतिपदा दिवसभर साजरी करावी. तसेच द्वितीया दुपारी 2.42 ला सुरू होणार असली तरी दिवसभर भाऊबीज साजरी करावी. पत्नी आणि बहीण कोणीही अगोदर ओवाळले तरी चालेल, अशी माहिती ज्येष्ठ पंचागज्ज्ञ दा.कृ.सोमण फेसबुक पोस्टमध्ये दिली आहे. यमद्वितीया/ भाऊबीज कार्तिक शुक्ल द्वितीया अपराण्हकाली असेल त्या दिवशी यमद्वितीया / भाऊबीज साजरी करावी. बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.42 वाजता कार्तिक शुक्ल प्रतिपदा संपून द्वितीया सुरू होत आहे. दिनमानाचे पाच भाग करावे. चौथ्या भागाला अपराण्हकाळ म्हणतात. बुधवार 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.31 ते दुपारी 3.49 अपराण्हकाल आहे. या काळात कार्तिक द्वितीया आहे. त्यामुळे बुधवार 26 आक्टोबरलाच भाऊबीज साजरी करायची आहे, असेही सोमण यांनी सांगितले आहे.

तीन शुभ योग यावर्षी, सर्वार्थ सिद्धी योग भाऊबीजेला बनला आहे, जो दुसऱ्या दिवशी दुपारी 12.11 ते 06.30 पर्यंत आहे. या योगात केलेली सर्व कामे सफल होतात. सकाळी 07.27 पर्यंत आयुष्मान योग तयार झाला आहे. त्यानंतर सौभाग्य योग सुरू होईल. दुसऱ्या दिवशी पहाटे 04:33 पर्यंत सौभाग्य योग राहील. हे तिन्ही योग शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात. भाऊबीजेचे महत्त्व - पौराणिक कथेनुसार, आपली बहीण यमुना हिच्या विनंतीवरून यमराज कार्तिक शुक्ल द्वितीयेला तिच्या घरी गेले. तेव्हा यमुना आपल्या भावाला पाहून खूप प्रसन्न झाली. त्यांचे स्वागत करून त्यांनी यमराजांना भोजन अर्पण केले, त्यामुळे ते प्रसन्न झाले. निघताना यमाने यमुनेला वरदान मागायला सांगितले. हे वाचा -  यंदा भाऊबीज-बलिप्रतिपदा एकाच दिवशी, बहिण-भावाच्या नात्याची अशा आहेत कथा तेव्हा यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी येशील. या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो, टिळा लावतो, भोजन घेतो, त्याला यमाच्या भयापासून मुक्ती मिळो. त्याला अकाली मृत्यूची भीती वाटणार नाही. तेव्हा यमराजाने यमुनेला हे वरदान दिले. त्यामुळे हा भाऊबीजेचा किंवा यम द्वितीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी यमाची पूजा आणि यमुना नदीत स्नान केल्याने मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या