जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / यंदा भाऊबीज-बलिप्रतिपदा एकाच दिवशी, बहिण-भावाच्या नात्याची अशा आहेत कथा

यंदा भाऊबीज-बलिप्रतिपदा एकाच दिवशी, बहिण-भावाच्या नात्याची अशा आहेत कथा

यंदा भाऊबीज-बलिप्रतिपदा एकाच दिवशी, बहिण-भावाच्या नात्याची अशा आहेत कथा

अपराण्हकाली कार्तिक शुक्ल द्वितीया असल्याने याच दिवशी यमद्वितीया भाऊबीज आहे. भाऊबीजेचा सण हा बहीण-भावाच्या मायेचा आहे. भाऊबीज सणाच्या कथा जाणून घेऊया.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर : बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी अपराण्हकाली कार्तिक शुक्ल द्वितीया असल्याने याच दिवशी यमद्वितीया भाऊबीज आहे. भाऊबीजेचा सण हा बहीण-भावाच्या मायेचा आहे. या दिवशी यम त्याची बहीण यमी हिच्या घरी भाऊबीजेसाठी गेला होता. या दिवशी यमपूजन करण्यास सांगण्यात आले आहे. याविषयी ज्येष्ठ पंचागतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया. बहीण-भावाचे नाते जन्मभर जरी तेच असले तरी वयोमानानुसार भाऊबीजेच्या सणाचे रूप मात्र कालानुरूप बदलत जाणारे असते. अगदी लहानपणी एका घरात वावरणारी ही भावंडे असतात. लहानपणी आयुष्य म्हणजे काय ते दोघांनाही समजलेलेच नसते. बहीण सासरी गेल्यावर हा सहवास संपणार आहे, याची कल्पनाही दोघांना नसते. आई-वडीलांच्या मायेखाली वावरणारी ही पाखरे हेच घराचे वैभव असते. ताई मोठी असेल तर ताईगिरी असते पण दोघांमध्ये ती जास्त समंजस असल्याने आपल्या छोट्या दादाला ती जपत असते. दोघांमध्ये जर दादा मोठा असेल तर मग काय विचारायलाच नको. दादागिरी असली तरी दादा सतत आपल्या ताईला जपत असतो. लहानपणी, खेळ, मस्ती, हट्टीपणा, कधी रडणे, चिडणे हे चालूच असते. दरवर्षी घरातील भाऊबीजेचा थाट काही वेगळाच असतो. सकाळी लवकर उठल्यावर दादा ताईकडून अभ्यंगस्नापूर्वी उटणे लावून घेतो. तेल लावून घेतो. ताई सर्वकाही प्रेमाने हसत, हसत करीत असते. आई-बाबानी आणलेले नवीन कपडे घालून जेवणापूर्वी ताई दादाला ओवाळते. ती मज्जा काही वेगळीच असते. दादाच्या डोक्याला कुंकू तिलक, अक्षता लावून ताई दादाला ओवाळते. निरांजनाची काळजी घ्यायला आई असते. बाबानी ताईला भाऊबीज म्हणून द्यायला दिलेले पाकीट दादा तबकात लगेच ठेवत नाही. पुन्हा पुन्हा ओवाळायला सांगतो. शेवटी ताईने विनवणी करताच किंवा आईने सांगताच दादा भाऊबीज तबकात ठेवतो. लहानपणची ती भाऊबीज संस्मरणीय असते. मस्ती, भांडणे, वादावादी, अभ्यास यात दरवर्षी येणारा भाऊबीजेचा सण दिवाळीचा आनंद द्विगुणीत करीत असतो. मग काही वर्षे अशीच जात असतात. ताईचे लग्न होऊन ताई सासरी गेलेली असते. दादाचेही लग्न झालेले असते. भाऊबीजेचा दिवस येतो. दादा भाऊबीजेसाठी ताईच्या घरी जायचा असतो. ताई सकाळपासून दादाच्या स्वागताची तयारी करीत असते. दुपार होते. दादा येण्याची आतुरतेने वाट पाहत असते. दादा येतो. ताईचा पहिलाच प्रश्न असतो. आई-बाबा कसे आहेत ? बाबांची तब्बेत कशी आहे ? नंतर भाऊबीजेचा ओवाळण्याचा कार्यक्रम होतो. निरांजनाला सांभाळणारी ताई पाहून दादाला लहानपणची आठवण येते. दादा ताईच्या आवडीच्या रंगाची आणलेली साडी ताईला भाऊबीज म्हणून देतो. जेवण झाल्यावर दादा घरी जायला निघतो. दादाला निरोप देतांना ताईचे डोळे पाणावतात. “ आई-बाबांच्या तब्बेतीच काळजी घे !” ताई गहिवरून बोलते. दादा भाऊबीजेचा हृद्य सोहळा आटोपून घरी जातो.

News18लोकमत
News18लोकमत

आणखी अनेक भाऊबीजेचे सण निघून जातात. आता दादा - ताई दोघेही वृद्ध झालेली असतात. दोघांचेही संसार फुललेले असतात. ताईचे मिस्टर जग सोडून गेलेले असतात. भाऊबीज येते पण आता तब्बेतीच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात. दादाला आता गोड खायचे नसते. स्वयंपाक करतानाच ताईने तशी काळजी घेतलेली असते. ओवाळण्याचे तबक देवापाशीच निरांजन लावून ठेवलेले असते. दादा आणलेली भाऊबीज देवाजवळच्या तबकातच ठेवतो. जेवणानंतर दादा विश्रांती घेऊन ताईचा निरोप घेऊन घरी जायला निघतो. दोघांच्याही डोळ्यात अश्रू येतात. सणाचा दिवस असूनही निरोप घेतांना एक वाईट विचार दोघांच्याही मनात येतो. पुढची भाऊबीज असेल की नाही ! मनात आलेला विचार बोलण्याची हिंमत होत नसते. नमस्कार करून निरोप घेतला जातो. भाऊबीजेचा सण दोघांचीही मने एकत्र गुंफून ठेवीत असतो. बहीण-भावाचे नातेच तसे असते एका रक्ताचे ! कथा भाऊबीजेच्या भाऊबीजेसंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत. अर्थात त्यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा नाही. फक्त भावार्थ पहावयाचा. एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली की “ ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या .” यमदूत अशा माणसाचा शोध घेत पृथ्वीवर फिरू लागले. एका बहिणीला ही बातमी कळली. तिच्या भावाला आजवर कोणीही शिवी दिली नाही हे तिला माहित होते. मग आपल्या भावाला यमदूत नेऊ नयेत म्हणून ती भावाला शिव्या देत ती त्याच्या घरी गेली. प्रथम तिच्या माहेरच्या माणसांना वाटले की तिला वेड लागले. पण तिच्या तोंडून वस्तुस्थिती कळताच सर्वांना तिचे कौतुक वाटले. भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस कार्तिक शुक्ल द्वितीयेचा होता. तिथपासून भाऊबीजेचा सण सुरू झाला. हे वाचा -  27 वर्षांनी दिवाळीत असा योगायोग; सूर्यग्रहणात काय करावं, काय टाळावं जाणून घ्या दुसऱ्या एका कथेप्रमाणे यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला जातात.त्या दिवशी मृत्युमुखी पडलेल्यांना त्या दिवसापुरते जीवदान देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात