लक्ष्मीपूजन
मुंबई 24 ऑक्टोबर : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि भक्तांवर आयुष्यभर आशीर्वाद देते. त्यामुळे लोक विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करतात. प्रत्येक लोक वेगवेगळ्या पद्धतीने देवीची पूजा करतात. ज्यामध्ये चोपडी पूजन, शंख पूजन, कवडी पूजन सारख्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात.
दिवाळी
च्या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनासाठी विशेष साहित्याची आवश्यकता असते. यासाठी तुम्ही जर पूजेचे साहित्य जमा केले नसेल, तर आम्ही तुम्हाला यासाठी मदत करणार आहोत. त्यापूर्वी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
कार्तिक अमावस्या तिथीची सुरुवात - 24 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 05.27
कार्तिक अमावस्या समाप्ती - 25 ऑक्टोबर 2022, दुपारी 04.18 वाजता
लक्ष्मी पूजन प्रदोष काल मुहूर्त (संध्याकाळी) - 24 ऑक्टोबर संध्याकाळी 07:02 वाजता - 08 ते 23 मिनिटे
लक्ष्मी पूजन निशिता काल मुहूर्त (मध्यरात्री) - 24 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 11:46 ते 25 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12:37 पर्यंत
दिवाळी पूजन सामग्री गणपती आणि लक्ष्मीची नवीन मूर्ती किंवा फोटो वही-खाते लक्ष्मीसाठी एक लाल रेशवस्त्र आणि एक पिवळे वस्त्र देवाच्या आसनासाठी लाल कापड मूर्तीसाठी लाकडी स्टूल मातीचे पाच मोठे दिवे 25 लहान मातीचे दिवे एक मातीचे भांडे ताज्या फुलांच्या किमान तीन माळा बिल्वची पाने आणि तुळशीची पाने मिठाई, फळे, ऊस 3 देठाची पानं दुर्वा पंच पल्लव जनेयू, कापूर दक्षिणा, धूप गहू, लोणी, बताशे, शाई, अशी करा पूजा
लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घ्यावं त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदी किंवा साधी नाणी ठेवावी. यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. लक्ष्मीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. पूजेचे सामान शुद्ध करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मंत्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह पूजा करावी. यानंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकले असल्यास क्षमायाचना करावी. लक्ष्मीपूजनावेळी पाळावयाचे काही नियम
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरू ठेवावेत लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवावी लक्ष्मी देवीला शिंगाडा, बत्ताशे, लाह्या, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)