JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / धनत्रयोदशीला या 5 गोष्टींची खरेदी करणं शुभ; घरावर राहते देवी लक्ष्मीची कृपा

धनत्रयोदशीला या 5 गोष्टींची खरेदी करणं शुभ; घरावर राहते देवी लक्ष्मीची कृपा

धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या 5 वस्तू खरेदी कराव्यात, जेणेकरून माणसाच्या जीवनात सुख-समृद्धी येईल, याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : हिंदू धर्मात धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. धनाची देवता कुबेर आणि औषधाची देवता धन्वंतरी यांची या दिवशी पूजा केली जाते. पंचांगानुसार या वर्षी धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या 5 वस्तू खरेदी कराव्यात, जेणेकरून माणसाच्या जीवनात सुख-समृद्धी येईल, याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत. दिपावलीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी या पूजेसाठी नवीन मूर्तीची स्थापना केली जाते. लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशी ही सर्वोत्तम तिथी मानली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या आगमनाने घरात सुख-समृद्धी वाढेल. तुमच्या आयुष्यात कधीही पैसा कमी पडू नये आणि संपत्तीत वाढ व्हावी, अशी तुमची इच्छा असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी धनं (कोथिंबीरीचे बी) नक्कीच खरेदी करा. या दिवशी धनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पूजेत धनं लक्ष्मीला आणि संपत्ती कुबेरांना अर्पण करावे. धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणे आरोग्याच्या दृष्टीने शुभ आणि लाभदायक मानले जाते. पितळ हा भगवान धन्वंतरीचा धातू मानला जातो. पितळेमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. धार्मिक मान्यतांनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी खरेदी केलेल्या झाडूने सर्वप्रथम धान्याचे भांडार झाडून घ्यावे असे म्हणतात. असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाचे संकट येणार नाही.

धनत्रयोदशीच्या दिवशी शंख-कवड्या खरेदी करणे शुभ मानले जाते. प्राचीन काळी कवड्यांचा उपयोग पैसा म्हणून केला जात असे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये या कवड्या अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. हे वाचा -  दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या