द्वादश ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने त्यांनी आपली पदयात्रा सुरू केली.
विक्रम कुमार झा, प्रतिनिधी पूर्णिया, 29 जुलै : देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण उपवास, साग्रसंगीत पदार्थांचं नैवेद्य, असे अनेक उपाय करत असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने देवावरील श्रद्धा व्यक्त करत असतं. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने तर अशापद्धतीने आपली भक्ती व्यक्त केली की, जिल्ह्यातील इतर रहिवाशांनी त्यांचं धुमधडाक्यात स्वागत केलं. अविनाश कुमार झा असं या व्यक्तीचं नाव असून त्यांनी चक्क 12 ज्योतिर्लिंग आणि चारधामसह तब्बल 52 हजार मंदिरांचं पायी चालत दर्शन घेतलं. 10 महिने त्यांचा हा प्रवास सुरू होता.
पूर्णियाच्या सरसी बोहराचे रहिवासी अविनाश कुमार झा हे 8 सप्टेंबर 2022 रोजी पहिल्यांदा या दर्शनासाठी घरातून बाहेर पडले. द्वादश ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने त्यांनी आपली पदयात्रा सुरू केली. ते घरी परतल्यावर लोकांनी गळ्यात फुलांची माळ घालून त्यांचं स्वागत केलं. त्यांना शरीरविक्री करावी लागू नये म्हणून धनंजय आला पुढे, सुपरस्टार आयुष्मानने केली मदत पण… अविनाश कुमार झा हे या देवदर्शनासाठी तब्बल 16000 किलोमीटर अंतर पायी चालले. या प्रवासादरम्यान अत्यंत प्रसन्न वाटल्याचं त्यांनी सांगितलं. काही अडचणी आल्या मात्र ते मागे हटले नाहीत. महादेवांना डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला. ते म्हणतात, ‘मी हिंदू धर्म प्रचारक आहे. मात्र सर्व धर्म समान आहेत. सर्वांमध्ये एकजूटपणा असायला हवा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.