मुंबई, 22 जून: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 22 जून 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. दिवसासाठीचा सारांश: आजचं ओरॅकल रीडिंग, प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतं. जीवनात प्रभावीपणे मार्गाक्रमण करण्यासाठी हे मार्गदर्शन वापरलं पाहिजे. तुमच्या मार्गात येणार्या सकारात्मक उर्जा आणि संधींचा स्वीकार करा, तसेच आव्हानांचंही भान ठेवा. तुम्ही उज्ज्वल आणि परिपूर्ण भविष्याकडे वाटचाल करताना तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. घरापुढे लावा विशेष वृक्ष, नकारात्मक शक्तींपासून होईल रक्षण, शनिदोषही संपेल मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल) तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सुसंवाद तयार होण्याची आणि बंध दृढ होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रियजनांचं पालनपोषण आणि कौतुक करण्यासाठी वेळ काढा. तुम्ही उर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. त्यामुळे आव्हानात्मक कामं हाताळण्यासाठी ही एक आदर्श वेळ असेल. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या अंतःप्रेरणेवर अधिक विश्वास ठेवा आणि नंतर हालचाल करा. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पण, आवेगपूर्ण खर्च टाळा. दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला बचत करण्याची चांगली योजना सापडेल. इतरांवर टीका करण्यापेक्षा अर्थपूर्ण संभाषणांमध्ये गुंतून तुमच्या मित्रांशी बंध दृढ करण्याचा प्रयत्न करा. कामाचं आश्वासन देण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या. तुमच्यातील उर्जा टिकून राहण्यासाठी ब्रेक घ्या. आपल्या दिनचर्येत एखाद्या नवीन गोष्टीचा समावेश करण्याचा विचार करा. LUCKY Crystal - Lapis Lazuli LUCKY Color - Blue LUCKY Number - 15 वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे) तुमची नाती मजबूत करण्यासाठी तुम्ही भावनिकदृष्ट्या मोकळे होण्याची वेळ आली आहे. प्रामाणिकपणे आणि मनापासून साधलेला संवाद तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या आणखी जवळ आणेल. सहकारी आणि वरिष्ठांशी बोलताना शांत राहा. समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी टीमवर्क करण्यावर भर द्या. आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. गरजेच्या वेळी पाठिंबा देऊन तुमची मैत्री अधिक घट्ट करा. बंध दृढ करण्यासाठी गेट-टुगेदर प्लॅन करा. गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी नीट माहिती मिळवा. सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुम्हाला आनंद देणार्या क्रियामध्ये गुंतून राहा. भविष्यातील कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. LUCKY Crystal - Howlite LUCKY Color - Bronze LUCKY Number - 7 मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) प्रामाणिक संवाद ही यशस्वी नात्याची गुरुकिल्ली असेल. स्पष्टपणे व्यक्त व्हा आणि आपल्या प्रियजनांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. तुमचा अनुकूल स्वभाव आणि पटकन निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला आव्हानं सहजपणे हाताळता येतील. नवीन कल्पना आणि पार्टनरशीप स्वीकारा. कोणत्याही प्रकारचे आर्थिक नियोजन करताना बजेटवर अधिक भर द्या. दीर्घकालीन नफ्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणा. नवीन लोकांना भेटण्यासाठी आणि तुमचं नेटवर्क वाढवण्यासाठी सामाजिक क्रियांमध्ये व्यग्र राहा. मनमोकळ्या आणि प्रामाणिक संवादातून सध्याची मैत्री दृढ करा. माइंडफुलनेस आणि तणाव व्यवस्थापन तंत्रांचा सराव करून मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. ताजंतवानं होण्यासाठी ब्रेक घ्या. LUCKY Crystal - Hematite LUCKY Color - Orange LUCKY Number - 3 कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) काळजी आणि सहानुभूतीनं आपले नातेसंबंध जोपासा. गरज वाटत असल्यास आपल्या प्रियजनांचं कौतुक करा. एकट्याने निर्णय घेताना तुमच्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा. सहकाऱ्यांना सहकार्य करा कारण तुमचे वरिष्ठ तुमच्यावर लक्ष ठेवत असल्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत संतुलित दृष्टिकोन ठेवा. जास्त खर्च टाळा आणि गुणवत्तेमध्ये जास्त गुंतवणूक करा. जुन्या मित्रांशी पुन्हा कनेक्ट व्हा. त्यांना सहानुभूती दाखवा आणि त्यांचा आधार व्हा. घाईगडबडीत निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. काम करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि सखोल माहिती मिळवा. स्वत: ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. तुम्हाला शांती आणि आनंद मिळवून देणार्या क्रियांमध्ये व्यस्त रहा. LUCKY Crystal - Sun Stone LUCKY Color - Yellow LUCKY Number - 50 प्राण्यांकडूनही शिकता येतील वास्तूचे हे नियम, कोणती जमीन राहण्यासाठी असते शुभ सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा आणि प्रेम व्यक्त करा. उत्स्फूर्तपणे रोमँटिक सरप्राईज प्लॅन करा. तुमची नेतृत्व कौशल्ये चमकतील. ज्यामुळे तुम्हाला इतरांना प्रेरणा देणं शक्य होईल. आव्हानांचा आत्मविश्वासानं स्वीकार करा. तुमच्या मित्रांच्या यशाचा आनंद साजरा करा आणि त्यांना पाठिंबा द्या. बंध दृढ करण्यासाठी सामाजिक संमेलनांची योजना करा. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी ऑफिसमध्ये वरिष्ठांचा सल्ला घ्या. तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी जुळणाऱ्या कमिटमेंटवर लक्ष केंद्रित करा. मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या. आनंद देणाऱ्या क्रियांमध्ये व्यस्त रहा आणि तणाव व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करा. LUCKY Crystal - Blue Sapphire LUCKY Color - Neon Green LUCKY Number - 22 कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) नातेसंबंधात प्रभावी संवाद आणि समजतूदारपणा यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या गरजा व्यक्त करा आणि तुमच्या जोडीदाराचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. तपशील आणि संस्थेकडे लक्ष दिल्यास यश मिळेल. विचलित न होता तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक बचतीसाठी चांगली योजना तयार करून तिचं पालन करा. इतरांजवळ स्वत:चे अवास्तव आर्थिक आणि वैयक्तिक तपशील उघड करणं टाळा. एक विश्वासू आणि सोपर्टिव्ह मित्र बना. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्या आणि गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन करा. गुंतवणुकीच्या संधींचा सखोल अभ्यास आणि विश्लेषण करा. नवीन तंत्रज्ञानाद्वारे आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. LUCKY Crystal - Garnet LUCKY Color - Mustard LUCKY Number - 14 तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्या रोमँटिक नात्यामध्ये संतुलन आणि समजदारपणा ठेवा. भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कोणत्याही संघर्षांचे निराकरण करण्यासाठी मुक्त आणि प्रामाणिक संवादावर भर द्या. कामाच्या ठिकाणी सर्वांना सहकार्य करा आणि डिप्लोमॅटिक दृष्टिकोन ठेवा. सर्जनशीलतेचा वापर करून वाढत्या समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधा. खर्चाचं व्यवस्थापन करा. प्रगती आणि स्थिरतेसाठी नवीन संधी शोधा. सक्रियपणे ऐकून आणि पाठिंबा देऊन आयुष्यात अर्थपूर्ण कनेक्शन वाढवा. बंध मजबूत करण्यासाठी सामाजिक उपक्रमांची योजना आखा. संभाव्य गुंतवणुकीचे काळजीपूर्वक मूल्यांकन करा. दीर्घकालीन आर्थिक लाभासाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा. शारीरिक आणि भावनिक आरोग्यामध्ये संतुलन शोधा. जीवनशैली साधी ठेवा. LUCKY Crystal - Tiger Eye LUCKY Color - Crimson LUCKY Number - 9 जुलैमध्ये होणार शुक्र ग्रहाचे महासंक्रमण, या 4 राशीच्या लोकांवर होणार धनवर्षा
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) लहान पण अर्थपूर्ण गोष्टींतून आपल्या प्रियजनांशी भावनिक बंध विकसित करा. आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि बेधडकपणे आपल्या भावना व्यक्त करा. आव्हानांवर मात करण्यासाठी तुमची आंतरिक शक्ती आणि दृढनिश्चयाचा वापर करा. दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यावर आणि धोरणात्मक नियोजनावर लक्ष केंद्रित करा. जोखीम आणि फायद्यांचं विश्लेषण करून योग्य आर्थिक निर्णय घ्या. आवेगपूर्ण आणि महागडी खरेदी टाळा. निष्ठा आणि विश्वासाद्वारे मैत्री मजबूत करा. मित्रांना पाठिंबा द्या. गुंतवणुकीच्या संभाव्य संधींचा काळजीपूर्वक अभ्यास करा. निर्णय घेण्यापूर्वी अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही नफ्यांचा विचार करा. स्वत: ची काळजी घेण्याला प्राधान्य द्या. विश्रांती देणाऱ्या आणि तणाव कमी करणाऱ्या क्रियांमध्ये व्यस्त रहा.
LUCKY Crystal - Topaz LUCKY Color - Tan LUCKY Number - 24 धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) आपल्या नातेसंबंधांमध्ये उत्स्फूर्तता आणि साहसी गोष्टींचा स्वीकार करा. आपल्या प्रियजनांसह रोमांचक गोष्टी करण्याची योजना आखा आणि त्यातून आठवणी तयार करा. प्रगतीसाठी नवीन संधींचा स्वीकार करा. तुमचा आशावादी दृष्टिकोन तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देईल. आर्थिक बाबी हाताळताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेरणा आणि सकारात्मकतेचा स्रोत बनून तुमची मैत्री वाढवा. बंध मजबूत करण्यासाठी सोशल गेट-टुगेदरची योजना आखा. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणुकीच्या संधींचं कसून मूल्यांकन करा. जोखीम कमी करण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणा. संतुलित जीवनशैली राखा. LUCKY Crystal - Smokey Quartz LUCKY Color - Grey LUCKY Number - 49 मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) आपल्या नातेसंबंधांमध्ये निष्ठा आणि वचनबद्धता दाखवा. तुमच्या प्रियजनांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याला प्राधान्य द्या आणि त्यांना पाठिंबा द्या. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि वागण्यात शिस्तबद्धपणा ठेवा. तुमच्यातील मेहनत आणि चिकाटी हे गुण अनुकूल परिणाम मिळवून देतील. आर्थिक बाबतीत एक पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारा. प्रभावी बजेट तयार करा आणि तुमच्या कुटुंबालाही, विशेषत: मुलांना तेच नियम पाळण्यास प्रवृत्त करा. तुमच्या मित्रांच्या निष्ठेचं कौतुक करा आणि एक विश्वासू सहकारी बना. अर्थपूर्ण संबंधांद्वारे तुमची मैत्री वाढवा. गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगा. पूर्ण संशोधन करा आणि निर्णय घेण्यापूर्वी व्यावसायिक मार्गदर्शन घ्या. बर्नआउट टाळण्यासाठी स्वत: ची काळजी घ्या. LUCKY Crystal - White Opal LUCKY Color - Lavender LUCKY Number - 12 कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमचं खरं व्यक्तीमत्व इतरांना दिसावं यासाठी मनमोकळेपणानं वागा. प्रामाणिकपणे संवाद साधा आणि एकमेकांच्या दृष्टीकोनांचा आदर करा. चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या अद्वितीय कल्पना तुम्हाला यश आणि ओळख मिळवून देतील. व्यावहारिक बजेट तयार करून आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करा. मित्रांमध्ये एकतेची आणि पाठिंब्याची भावना वाढवा. बौद्धिक चर्चांमध्ये व्यस्त रहा आणि वैचारिक विविधतेचा स्वीकार करा. संभाव्य गुंतवणुकीचं काळजीपूर्वक विश्लेषण करा. अनुकूल परिणाम निश्चित करण्यासाठी व्यावसायिक सल्ला घ्या. तुमच्या मनाला चालना देणार्या क्रियांमध्ये गुंतून मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. LUCKY Crystal - Carnelian LUCKY Color - Violet LUCKY Number - 8 मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) करुणा आणि सहानुभूतीनं तुमचे भावनिक संबंध वाढवा. नातेसंबंधांबाबत निर्णय घेताना तुमच्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा. तुमच्यातील सर्जनशील ऊर्जेचा वापर करा. तुम्ही काही काळापासून लक्ष ठेवून असलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत टीमवर्क करा. आर्थिकबाबतीत शिस्त पाळा. बचत आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य द्या. दयाळू आणि समजूतदार मित्र व्हा. कम्युनिटीला त्यांच्या प्रयत्नांमध्ये पाठिंबा आणि मदतीचा हात द्या. काम करण्यापूर्वी कसून अभ्यास करा आणि व्यावसायिक सल्ला घ्या. विश्रांती मिळवण्यासाठी आंतरिक शांती वाढवणाऱ्या क्रियांमध्ये व्यस्त रहा. भावनिक संतुलन राखण्यासाठी स्वत: ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. LUCKY Crystal - Emerald LUCKY Color - Red LUCKY Number - 19