JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Crow pecks raghav chadha: अचानक कावळा चोच मारुन जाण्याचा अर्थ काय? खासदार चढ्ढाशी घडलेल्या प्रकाराचा संकेत

Crow pecks raghav chadha: अचानक कावळा चोच मारुन जाण्याचा अर्थ काय? खासदार चढ्ढाशी घडलेल्या प्रकाराचा संकेत

Crow pecks raghav chadha: अशा प्रकारे कावळ्याचे चोच मारून जाण्याचा काय अर्थ असावा? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. तसं ही एक साधी घटना आहे. पण जर आपण शकुन शास्त्राविषयी बोलायचे झाल्यास…

जाहिरात

कावळ्याने चोच मारून जाण्याचा अर्थ काय?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा होणारा नवरा आणि आम आदमी पार्टीचा खासदार राघव चड्ढा याच्यासोबत काल एक वेगळीच गोष्ट घडली. चढ्ढा संसदेच्या आवारात असताना त्याच्यावर एका कावळ्याने अचानक हल्ला केला. राघव चढ्ढाचे संसदेच्या आवारातील ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये कावळ्याने त्याच्यावर हल्ला केल्याचे दिसत आहे. राघव चढ्ढा संसदेच्या बाहेर फोनवर बोलण्यात व्यग्र असताना अचानक एक कावळा त्याला चोच मारून गेला. अनेकजण याकडे गंमतशीर घटना म्हणून पाहत आहेत तर काहींना हे अशुभ वाटत आहेत. अशा प्रकारे कावळ्याचे चोच मारून जाण्याचा काय अर्थ असावा? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. तसं ही एक साधी घटना आहे. पण जर आपण शकुन शास्त्राविषयी बोलायचे झाल्यास त्याचा शुभ किंवा अशुभ अर्थ आहे. कावळ्याशी संबंधित शुभ आणि अशुभ गोष्टी जाणून घेऊ. कावळ्याचे अशुभ संकेत - शकुन शास्त्रानुसार जर कावळा दारात दक्षिणेकडे तोंड करून काव-काव करत असेल तर ते अशुभ लक्षण आहे. म्हणजे घरातील एखादा व्यक्ती आजारी पडू शकतो.

जर कावळा डोक्यावर चोच मारुन निघून गेला तर याचा अर्थ काहीतरी अशुभ घडणार आहे किंवा काही संकटाला सामोरे जावे लागेल. घराच्या छतावर कावळ्यांचा कळप आवाज करत असेल तर ते देखील अशुभ मानले जाते. म्हणजे काहीतरी मोठे संकट येणार असल्याचे मानले जाते. कावळ्यानं एखाद्याला चोच मारण्याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. हा त्रास शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक असू शकतो. कावळा डोक्याला स्पर्श करून निघून गेला तर याचा अर्थ तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण तुम्ही काही अडचणीत येऊ शकता. रॉयल लाइफ जगण्याचे शौकीन असतात या राशीची माणसं; स्वप्न सत्यातही उतरवतात कावळा शुभ संकेतही देतो - सकाळी बाल्कनीत, छत इत्यादी ठिकाणी एखादा कावळा वावरत असेल तर समजावे की घरात कोणी पाहुणे, नातेवाईक येणार आहेत. जर दारात कावळा उत्तरेकडे तोंड करून काव-काव करत असेल तर ते शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ मिळू शकतो. जर कावळा तोंडात भाकरीचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर ते देखील शुभ लक्षण आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे किंवा काही इच्छा पूर्ण होणार आहेत. जर कावळा तुमच्या पायांना स्पर्श करून गेला असेल तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. समाजात तुमचा मान-प्रतिष्ठा वाढेल असा त्याचा अर्थ होतो. घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या