- ज्योतिष शास्त्रानुसार, सोमवती अमावस्येच्या दिवशी ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल त्यांनी भगवान शंकराची पूजा करावी. भगवान शंकराच्या पूजेसोबत रुद्राभिषेक करावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि कालसर्प दोषाचा अशुभ प्रभावही कमी होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
पिंपळ उगवणे - वास्तू आणि हिंदू धार्मिक शास्त्रानुसार, घरात/गच्चीवर पिंपळाचे झाड उगवणे अशुभ मानले जाते. घरामध्ये पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल तर ते पितृदोषाचे लक्षण मानले जाते. तुमचे मृत पूर्वज म्हणजे पितर देव तुमच्यावर नाराज असल्याचा तो संकेत समजावा.
यावर उपाय म्हणजे कोणत्याही सोमवारी पिंपळाचे झाड मुळांसह उपटून नदीत फेकून द्यावे. तसेच येत्या सोमवती अमावस्येच्या दिवशी गरिबांना दान करा. शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करा. असं केल्यानं मृत पितर तृप्त होतात. परिणामी पितृदोषापासून मुक्ती मिळते.
अतिविचार करणं - जर एखादी व्यक्ती कोणत्याही कामाबद्दल जास्त विचार करत असेल किंवा आपण कुठेतरी अडकलो आहोत, असे वाटत असेल तर ते चांगले लक्षण नाही. यामागे पूर्वज दोष असू शकतो असे विद्वान आणि पंडित सांगतात.
अनावश्यक अतिविचार माणसाला वेडा बनवू शकतो. अशी स्थिती चंद्राच्या क्षीणतेमुळे देखील निर्माण होते. नियमित दिनचर्या नीट न पाळल्यास कुंडलीचा चंद्र दूषित होतो. अशा वेळी शिवलिंगावर नित्य जल अर्पण करावे असे सांगितले जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार, सोमवती अमावस्येच्या दिवशी ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल त्यांनी भगवान शंकराची पूजा करावी. भगवान शंकराच्या पूजेसोबत रुद्राभिषेक करावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि कालसर्प दोषाचा अशुभ प्रभावही कमी होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)