मुंबई, 02 ऑक्टोबर : प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि विचार करण्याच्या पद्धतीचा त्याच्या जन्माच्या महिन्याशी विशेष संबंध असतो. जन्म महिन्याच्या आधारेच मुलाचे विचार, समज आणि त्याचे भविष्य कसे असेल हे ठरवता येते. मुलाच्या जन्माच्या आधारावर, पालक त्याचे नाव देखील ठरवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या मुलांची खासियत सांगणार आहोत. ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक खूप मोहक बनतात. त्यांच्या मोहिनी आणि बुद्धिमत्तेशी बरोबरी साधणे, हे फार कमी लोकांना जमू शकते. ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक इतरांशी संपर्क साधण्यात आणि बोलण्यात खूप पटाईत असतात. त्यांच्या बोलण्याच्या आणि एकत्र राहण्याच्या पद्धतीमुळे प्रत्येकाला त्यांच्याशी मैत्री करावीशी वाटते. ते आशावादी असतात आणि त्यांची सकारात्मकता लोकांना त्यांच्या जवळ आणते. शांत स्वभाव - आचार्य इंद्रमणी घनश्याल सांगतात की, या महिन्यात जन्मलेली मुले स्वभावाने अतिशय शांत असतात. ते त्यांच्या भावना आतच ठेवतात आणि फारच कमी दाखवतात. त्यांना शत्रूंपेक्षा मित्र जास्त असतात. ते नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना स्वतःला जास्त लोकांशी बोलायला किंवा जास्त मित्र बनवायला आवडत नाही. नेहमी सकारात्मक विचार - ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक खूप आशावादी असतात आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. हे लोक कधीच हार मानत नाहीत आणि त्यांनी एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केला तर ते साध्य केल्याशिवाय थांबत नाहीत. एखाद्या गोष्टीत हरलो तरीही ते प्रयत्न करणे सोडत नाहीत. त्यांना बघून वाटणार नाही, पण ते खूप जिद्दी असतात आणि ध्येय गाठल्यावरच शांत होतात. यामुळे ही मुले इतरांनाही प्रेरित करण्याचे काम करतात.
खर्च करतात - त्यांच्याकडे पैसा असो वा नसो, ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक खूप खर्च करणारे असतात आणि मोठे झाल्यानंतरही ही त्यांची सवय सुटत नाही. त्यांना चैनीच्या गोष्टींवर खर्च करायला आवडते. जर त्यांच्याकडे पैसे असतील तर ते त्यांच्या आवडत्या वस्तू विकत घेण्यास जराही वेळ घालवत नाहीत. त्यांना फक्त स्वतःवरच नाही तर जवळच्या प्रिय लोकांवरही खर्च करायला आवडते. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान स्मार्ट-इंटेलिजेंट असतात हे लोक अभ्यासात चांगली कामगिरी करतात आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी त्यांचा वेळ आणि पैसा खर्च करतात. त्यांचे पूर्ण लक्ष त्यांच्या ध्येयावर असते आणि जेव्हा ते बोलतात तेव्हा ते योग्यच बोलतात.