ज्योतिषशास्त्रानुसार 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर मंगळवारी होणार आहे. 

याच्या एक दिवस आधी म्हणजे 24 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. 

ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाईल. कित्येक वर्षांनंतर असा दुर्मिळ योगायोग घडत आहे. 

सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. वेळ - दुपारी 04:23 पासून 06:25 पर्यंत. ग्रहणाची मध्य वेळ 05:28, मोक्ष 06:25 वाजता असेल. सुतक वैध नाही.

ग्रहण लागणे ही ज्योतिषशास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते.

सूर्यग्रहणात या चार राशींच्या अडचणी वाढू शकतात - 

वृषभ राशीच्या लोकांच्या अडचणी वाढतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, आहाराची काळजी घ्या. धनहानी होण्याचीही शक्यता, ग्रहण काळात व्यवहार-गुंतवणूक टाळा.

मिथुन राशीला हे ग्रहण शुभ नाही, आर्थिक संकट येऊ शकतं. जोडीदारासोबत वेळ अनुकूल नसेल, मतभेद होऊ शकतात.

तूळ राशीला आधीच शनीची साडेसाती सुरू आहे. त्यात सूर्यग्रहण या राशीच्या लोकांच्या समस्या वाढवू शकते. मन अस्वस्थ आणि भयभीत राहील.

कन्या राशीच्या लोकांसाठी अशुभ आहे. उत्पन्नात घट संभवते, आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो, कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा.