JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहणात काय खावं आणि काय खाऊ नये? काय आहेत नियम?

Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहणात काय खावं आणि काय खाऊ नये? काय आहेत नियम?

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मंगळवारी 8 नोव्हेंबर 2022 रोजी होत आहे. ग्रहण काळात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या करण्यास मनाई आहे. त्यापैकी एक म्हणजे खाणे. पण काही खास परिस्थितींमध्ये अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 नोव्हेंबर : वर्षातील दुसरे चंद्रग्रहण मंगळवारी 8 नोव्हेंबर 2022 रोजी होत आहे. हे या वर्षातील शेवटचे ग्रहण असेल. 16 मे 2022 रोजी पहिले चंद्रग्रहण झाले होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या घटनेचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही आहे. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात कोणत्याही अन्नपदार्थाचे सेवन करू नये. हे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.32 ते 7.27 पर्यंत राहील. ग्रहणादरम्यान साधारणपणे कोणालाही खाण्याची बंदी असते. मात्र काही व्यक्तींना या काळात खाण्याची मुभा मिळू शकते. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी ग्रहण काळात कोणत्या व्यक्तींनी काय खावे आणि काय खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहणानंतर या वस्तू करा दान; लक्ष्मीची कृपा होईल, यश मिळेल, समस्यांमधूनही होईल सुटका

ग्रहण काळात कोणती व्यक्ती काय खाऊ शकते? सामान्यपणे ग्रहण काळात अन्न घेणे निषिद्ध आहे. पण गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती काही गोष्टी गरजेनुसार खाऊ शकतात. कारण वृद्धांना वयानुसार औषधांची गरज असते. तसेच गर्भवती महिलांना वेळोवेळी अन्न आणि पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषणाची गरज असते, त्यामुळे गर्भवती महिलांना जास्त काळ उपाशी राहू नये असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे लहान मुले जास्त काळ उपाशी राहू शकत नाहीत. त्यांना अन्न खाण्यासही मनाई केली जाऊ शकत नाही. मात्र या काळात पदार्थांमध्ये तुळशीची पाने जरूर टाकावीत.

ग्रहण काळात काय खाऊ नये धार्मिक शास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार ग्रहण काळात शिजवलेले अन्न आणि कापलेली फळं खाणे टाळावे. या दरम्यान शिजवलेले अन्न आणि कापलेली फळे खाल्ल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

Chandra Grahan 2022 : हे आहे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, या 4 राशीच्या लोकांनी राहावे खूप सावध

संबंधित बातम्या

ग्रहण काळात काय खावे वृद्ध, लहान मुले आणि गरोदर महिलांनी ग्रहण काळात दूध प्यायला हरकत नाही. या दुधात तुळशीची पाने टाकून उकळवा आणि मगच घ्या. याशिवाय ग्रहणकाळात नारळ, केळी, डाळिंब आणि आंबा खाऊ शकतो. तसेच ड्रायफ्रुट्सही खाऊ शकतो. त्यामध्ये भरपूर ऊर्जा असते, जी गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आणि आवश्यक असते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या