JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Chanakya Niti : जन्माच्या आधीपासून ठरलेल्या आहेत या 5 गोष्टी, असा करू शकता बदल

Chanakya Niti : जन्माच्या आधीपासून ठरलेल्या आहेत या 5 गोष्टी, असा करू शकता बदल

मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जून: आचार्य चाणक्यांनी आपल्या नीति ग्रंथातून यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत. आचार्य चाणक्य हे मौर्य साम्राज्यातील महान ज्ञानी होते. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इतिहासकारांच्या मते आचार्य चाणक्य यांनी मौर्य वंशाच्या स्थापनेचा पाया घातला. आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावानेही ओळखले जाते. त्यांनी अनेक धर्मग्रंथांची रचना केली आहे. यामध्ये अर्थशास्त्र आणि चाणक्य नीती हे प्रमुख आहेत. आजही अर्थशास्त्र आणि चाणक्य नीती समर्पक आहेत. नशिबाने आपल्याला कोणत्या गोष्टी मिळतात याविषयीही आचार्यांनी सविस्तरपणे सांगितले आहे. त्यांच्या मते जीव मातेच्या पोटात असतानाच त्याचे नशीब लिहिलेले असते. माणसाला हवे असले तरी ते बदलता येत नाही. चला, जाणून घेऊया त्याबद्दल सर्व काही- शमीच्या रोपाजवळ चुकूनही ठेवू नका या गोष्टी, दुर्दैवाला द्याल आमंत्रण आचार्य चाणक्य त्यांच्या नीती ग्रंथाच्या चौथ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात म्हणतात- आयुः कर्म च विद्या च वित्तं निधनमेव च . पञ्चैतानि विलिख्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः ॥ चाणक्यांच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, वय, कर्म, धन, ज्ञान आणि मृत्यू या 5 गोष्टी पुरुषाच्या गर्भात आल्यावर एकाच वेळी ठरतात. साधारणपणे त्यात कोणताही बदल होत नाही. कर्म आणि भाग्य माणसाला आयुष्यात काही गोष्टी त्याच्या कर्माच्या जोरावर मिळतात तर काही सुख-दु:ख नशिबाच्या जोरावर मिळतात. नशिबातून काय मिळते? चाणक्य नीतीनुसार कोणत्या गोष्टी फक्त नशिबानेच मिळतात, त्या कष्टाने कधीच मिळत नाहीत. वय चाणक्याच्या मते, जेव्हा मूल आईच्या पोटात वाढत असते, तेव्हाच त्याची वयोमर्यादा निश्चित केली जाते. शिक्षण आचार्य चाणक्य यांच्यानुसार, एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात किती शिक्षण मिळेल हेदेखील आधीच ठरवले जाते. शनिदेवाला प्रिय आहे घोड्याची नाल, साडेसाती टाळण्यासाठी करा हा उपाय संपत्ती चाणक्यानुसार, व्यक्ती आपल्या आयुष्यात किती संपत्ती कमावणार हेदेखील आधीच ठरवले जाते. कर्म चाणक्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीचे कर्म त्याच्या नशिबात आधीच लिहिलेले असते. मृत्यू माणसाचा मृत्यू केव्हा आणि कसा होईल हेदेखील आधीच ठरवले जाते, ते कोणत्याही कृतीने बदलता येत नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या