JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ayodhya Ram Mandir: अयोध्येत मंदिराच्या कामाची लगबग, श्रीरामाची मूर्ती बनवण्याच्या कामालाही सुरुवात, अशी असेल

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत मंदिराच्या कामाची लगबग, श्रीरामाची मूर्ती बनवण्याच्या कामालाही सुरुवात, अशी असेल

Ayodhya Ram Mandir: डिसेंबर 2023 मध्ये प्रभू श्रीरामाच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण होईल आणि जानेवारी 2024 मध्ये श्रीराम त्यांच्या गर्भगृहात विराजमान होतील. तीर्थक्षेत्र ट्रस्टने आता श्रीरामाची मूर्ती बनवण्याची तयारी वेगवान केली आहे.

जाहिरात

अयोध्या राममंदिर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अयोध्या, 27 एप्रिल : अयोध्येत राममंदिर आता आकार घेत असल्यानं रामभक्तांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. भक्तीभावाने ओथंबलेले राम भक्त दूरदूरवरून अयोध्येत आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत. मंदिराच्या बांधकामासोबतच श्रीरामाची मूर्ती बनवण्याच्या कामाचाही श्री गणेशा झाला आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथील कृष्ण श्यामल रंगीत दगडांपासून श्रीरामाची मूर्ती बनवली जाणार आहे. ज्याचे कोरीव काम अयोध्येच्या रामसेवकपूरमच्या कार्यशाळेत सुरू झाले आहे. डिसेंबर 2023 मध्ये प्रभू श्रीरामाच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण होईल आणि जानेवारी 2024 मध्ये श्रीराम त्यांच्या गर्भगृहात विराजमान होतील. तीर्थक्षेत्र ट्रस्टने आता श्रीरामाची मूर्ती बनवण्याची तयारी वेगवान केली आहे. कदाचित त्यामुळेच देशातील प्रसिद्ध शिल्पकार लोक सध्या अयोध्येत कर्नाटकातील कृष्ण श्यामल रंगीत दगडांवर कार्य करत आहेत. दगडांची गुणवत्ता तपासण्याचे काम - शिल्पकलेचे तज्ज्ञ सध्या कर्नाटकातील म्हैसूर येथून आणलेल्या दगडांची गुणवत्ता तपासत आहेत. त्याचा आकार आणि प्रकार काढण्यासाठी दगडातून 7.5 फूट दगड कापण्याचे काम सुरू आहे. सध्या कृष्ण श्यामल रंगाचे दोन दगड निवडण्यात आले आहेत. त्यातून जो उत्तम दगड असेल. त्या दगडातून रामाचा आंचल पुतळा तयार केला जाणार आहे.

ट्रस्टकडून अखेर शिक्कामोर्तब - सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांनी रामाच्या मूर्तीबाबत काढलेल्या चित्रावर ट्रस्टने अखेर शिक्कामोर्तब केले आहे. कमळावर स्वार असलेल्या 5 वर्षाच्या मुलाच्या रुपात रामाची धनुष्यबाण हाती असलेली मूर्ती बनवली जाणार आहे. ज्याची लांबी 05 फूट असेल. प्रभू राम कमळाच्या फुलावर विराजमान असतील. हातात धनुष्यबाण असेल, भाविकांना या प्रतिमेचे अप्रतिम दर्शन मिळेल. या चुकीच्या सवयींमुळे कुंडलीत सूर्याची ग्रहस्थिती होते कमकुवत; अडचणी वाढतात दगडांना आकार देण्याचं काम - कृष्ण श्यामल दगडावर कार्य करण्यासाठी कर्नाटकातून आलेले कारागीर विपिन यांनी न्यूज 18 ला सांगितले की, रेप कटिंगद्वारे दगडांना आकार दिला जात आहे. कर्नाटकातील कृष्ण शीलेला कोरलं जात आहे. या दगडातून सुमारे 7.5 फूट दगड कापला जाणार आहे. एवढेच नाही तर आमच्याकडे इतर गडद रंगाचे दगडही उपलब्ध आहेत. त्या दगडांवरही चाचणी केली जात आहे. जो उत्तम असेल, त्यातून श्री रामाची मूर्ती बनवली जाईल. रामायण टीव्हीवर दिसण्यासाठी पडद्यामागे इतका झाला होता खटाटोप; 2 वर्षे चालला वाद दुसरीकडे, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य विश्व तीर्थ प्रपन्नाचार्य सांगतात की, श्रीरामाची मूर्ती कर्नाटकातून आलेल्या कृष्ण श्यामल रंगापासून बनवली जाईल. ज्याची लांबी 5 फूट असेल. भगवान श्री राम कमळाच्या फुलावर बसून भाविकांना अद्भूत दर्शन देतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या