JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ashadhi Wari 2023: ना कोणता रंग, ना धर्म, अशी असते वारी, एकतेचा संदेश देणारा खास Video

Ashadhi Wari 2023: ना कोणता रंग, ना धर्म, अशी असते वारी, एकतेचा संदेश देणारा खास Video

पंढरपूरची वारी हा वैष्णवांचा मेळा असून त्यात भेदाभेदभ्रम अमंगळ मानले जातात. याचा प्रत्यय पुण्यात आला असून सर्वधर्मीय धर्मगुरू पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्राची केदारी, प्रतिनिधी पुणे, 14 जून: विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेदभ्रम अमंगळ| असं संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात. याचाच प्रत्यय आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्यात आला आहे. पालखी पुणे मुक्कामी असताना हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, बौद्ध धर्माचे धर्मगुरू या सोहळ्यात सहभागी झाले. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींना अभिवादन करण्यात आले. एकात्मतेचा संदेश देणारी दिंडी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. पुणेकर नागरिकांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदीराच्या वतीने सर्व धर्मियांच्या उपस्थितीमध्ये संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांना अभिवादन दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुस्लीम बांधवांच्या वतीने वारकरी बंधू-भगिनींना भोजन पंगत दिली. राष्ट्रीय एकात्मता व सर्व-धर्मसमभावाच संदेश देण्यासाठी या अभिवादन दिंडीचे आयोजन करण्यात आले.

धर्मगुरूंचा संदेश आज जरी आम्ही वेगवेगळ्या धर्माचे असलो तरी एकत्रित प्रेमाने राहत आहोत. ही काळाची गरज असून आजच्या या अभिवादन दिंडीच्या माध्यमातून एक अनोखा संदेश देण्यात येणार असल्याचं यावेळी विविध धर्मीय धर्मगुरूंनी सांगितलं. आई सोडून गेली, आजी शेतीत काम करून सांभाळते; प्रमोदचं पखवाज ऐकून कराल कौतुक, Video 35 वर्षांपासून निघतेय दिंडी गेल्या 35 वर्षापासून आमच्या साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदीराच्या वतीने विविध सामाजिक कामे केली जात आहेत. सध्या राज्यातील परिस्थिती पाहता सामाजिक संदेश देण्यासाठी आमच्या मंडळाचा वतीने अभिवादन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, असे साखळीपीर तालीम मंडळाच्या अध्यक्षा शिवानी माळवदकर यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या