शिवानी धुमाळ, प्रतिनिधी पुणे, 14 जून: ‘पाहू द्या रे मज विठोबाचे रूप’ असे म्हणत आळंदी आणि देहू येथून पायी अंतर पार करत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सध्या लगबग सुरु आहे. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झालेली आहे. यामध्ये या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी दाखल झाले आहेत. यामध्ये 13 वर्षीय प्रमोद वायदंडे हा देखील दाखल झाला असून तो उत्तम पखवाज वाजवत आहे. कशी झाली आवड निर्माण? प्रमोद वायदंडे हा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगरचा रहिवासी आहे. प्रमोदचे वडील अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळून असतात. आई तो लहान असतानाच वारली. आई गेल्यांनंतर प्रमोदचा सांभाळ त्याच्या आज्जी आजोबांनी केला. त्यामुळे आजोबांमुळे त्याला भक्तिसंगीताची आवड निर्माण झाली.
आजोबांनी छोट्या प्रमोदला पखवाज वादन शिकवले आणि तो गावांमधल्या भजनी मंडळात सहभागी झाला. त्या ठिकाणच्या पखवाज वादनाने त्याने इतर गावकऱ्यांना मंत्र मुग्ध केले. पोराच्या हातात जादू आहे हे गावकऱ्यांनी ओळखून गावातल्या मंडळींनी त्याला वादनाची शिकवणी लावली. सध्या प्रमोद त्याच्या आज्जीबरोबर पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झाला आहे. मला संगीत क्षेत्रातच नाव कमवायचं आहे, असं प्रमोद सांगतो.
वारकऱ्यांची सेवा करणारे अब्दुल रजा, 20 वर्षांपासून करताय वारकऱ्यांची सेवा, Videoप्रमोदला व्हायचंय मोठा वादक सध्या आज्जी शेतात काम करून प्रमोद आणि त्याच्या मोठ्या भावाचा सांभाळ करत आहे. प्रमोद देखील गावाकडे वादनाचे धडे गिरवता गिरवता काही कार्यक्रमांमध्ये वादन करून आज्जीला हातभार लावत आहे. प्रमोदला त्याच्या शाळेतील गुरुजी यादव सर यांची देखील खूप मदत होत असल्याचं प्रमोदची आज्जी सांगते. मुलांना चांगलं शिक्षण देण्याची त्यांनी जिद्द बाळगली आहे आणि प्रमोदला मोठा वादक बनवायचं स्वप्न असल्याचं देखील आज्जीने सांगितले.