JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Jyeshtha amavasya: घरातील पितृदोष, कालसर्प दोष एकाच दिवशी घालवा; येत्या ज्येष्ठ अमावस्येला करा हे उपाय

Jyeshtha amavasya: घरातील पितृदोष, कालसर्प दोष एकाच दिवशी घालवा; येत्या ज्येष्ठ अमावस्येला करा हे उपाय

jyeshtha amavasya puja: ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा केली जाते. या दिवशी पितृदोष आणि कालसर्प दोष दूर करण्यासाठी उपाय करू शकता. या दिवशी केलेल्या ज्योतिषशास्त्रीय उपायांनी तुमचे भाग्यही उजळू शकते.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून : यंदाची ज्येष्ठ अमावस्या रविवार, 18 जून रोजी आहे. शनिवारी 17 जून रोजीच सकाळी सव्वा नऊच्या सुमारास दर्श अमावस्या सुरू होत आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा केली जाते. या दिवशी पितृदोष आणि कालसर्प दोष दूर करण्यासाठी उपाय करू शकता. या दिवशी केलेल्या ज्योतिषशास्त्रीय उपायांनी तुमचे भाग्यही उजळू शकते. धार्मिक मान्यतेनुसार, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी विधीपूर्वक स्नान-दान केल्यानं पुण्य प्राप्त होतं. येत्या अमावस्येच्या दिवशी पितृदोष, कालसर्प दोष यापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय तसेच भाग्य उजळण्याचे उपाय काशीच्या ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊया. ज्येष्ठ अमावस्या 2023 शुभ मुहूर्त - ज्येष्ठ कृष्ण अमावस्या तिथीची सुरुवात: 17 जून, शनिवार, सकाळी 09.11 वा. ज्येष्ठ कृष्ण अमावस्या तिथीची समाप्ती: 18 जून, रविवार, सकाळी 10.06 वा. स्नान आणि दानासाठी मुहूर्त: 18 जून, सकाळी 07.08 ते 12.37 पर्यंत

ज्येष्ठ अमावस्या 2023 कालसर्प दोषासाठी ज्योतिषीय उपाय - 1. जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर ज्येष्ठ अमावस्येला विधींच्या मदतीने शंकराची पूजा करा. राहुकालात ही पूजा करावी लागते, कारण कुंडलीत राहू आणि केतूच्या विशेष स्थानामुळे कालसर्प दोष निर्माण झालेला असतो. 2. याशिवाय अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून नदीच्या काठावर नाग आणि नागाच्या जोडीची पूजा करावी. नाग आणि नागाची जोडी शक्यतो सोन्याची किंवा चांदीची असावी, असे सांगितले जाते. पूजेनंतर ती नाग-नागिनीच्या जोडीची मूर्ती नदीच्या पाण्यात वाहू द्या. असे केल्याने कालसर्प दोषही दूर होतो. दारात या गोष्टींमुळे उंबरठ्याचं पावित्र्य भंग पावतं; चुकूनही तिथं अशा गोष्टी नको ज्येष्ठ अमावस्या 2023 पितृ दोष उपाय 1. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय म्हणजे अमावस्येच्या सकाळी स्नान करून पितरांना पाण्याने तर्पण अर्पण करावे. त्यांची देवता आर्यमाची पूजा करावी. पितरांसाठी वस्त्र, अन्न इत्यादी गरीब ब्राह्मणाला दान करा. 2. पितृदोषाचा एक उपाय म्हणजे तुम्ही पूजेच्या वेळी पितृ स्तोत्राचे पठण करा. यामुळे तुमचे पूर्वज प्रसन्न होतील. हा पाठ संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे ज्या लोकांना संस्कृत वाचता येत नाही त्यांनी कोणाची तरी मदत घ्यावी. 3. पितृदोष निवारणासाठी पंचबली नैवेद्य अर्पण केला जाऊ शकतो. यामध्ये कुत्रा, गाय, कावळा इत्यादींना अन्नाचा काही भाग दिला जातो. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास अमावस्येला भाग्य चमकण्यासाठी उपाय 1. ज्येष्ठ अमावस्येला पिठात साखर मिसळून काळ्या मुंग्यांना खाऊ घाला. यामुळे तुमची पापे नष्ट होतील आणि पुण्यवृद्धीमुळे भाग्याचा उदय होईल. 2. ज्येष्ठ अमावस्येला संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा. शक्यतो लाल रंगाच्या वातीने दिवा लावावा आणि गाईचे तूप वापरावे. त्यात केशर घाला, असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या संपत्तीत वाढ होईल. जूनमध्ये या 5 राशींवर बुध मेहरबान! संपत्ती वाढेल, नोकरी-व्यवसायात लाभाचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या